नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काढलेली 'युवा संघर्ष यात्रा' आज विधान भवनावर धडकत आहे. या यात्रेचे रूपांतर आज झिरो माईल जवळच्या टेकडी रोडवर जाहीर सभेत होत आहे.  या सभेला शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. शिवाय काँग्रेस पक्षाचे अनेक अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत. युवा संघर्ष यात्रा 24 ऑक्टोबरला पुणे येथून निघाली होती. या यात्रेने 10 जिल्हे, 30 तालुके आणि सुमारे 800 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. 


तरुणांचे विविध मुद्दे घेऊन निघालेली रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रेचा आज समारोप होत असताना, त्यांचे आजोबा शरद पवार वाढदिवस असतानाही सभेला उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार यांची ही यात्रा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात एका प्रकारे रोहित पवार यांचे नव्याने लौंचिंग मानली जात आहे. त्यामुळे नातवाच्या राजकीय जीवनातील महत्वाच्या टप्प्यावर शरद पवार हे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 


सभास्थळी कसं यायचं, रोहित पवारांनी शेअर केले  ग्राफिक्स


युवा संघर्ष यात्रेचं आज समारोप होत असून, नागपूरमध्ये होणाऱ्या समारोप सभेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात युवा, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक येणार आहेत. या सर्वांना सभास्थळी पोचताना काही अडचण येऊ नये आणि वाहतूक कोंडी होऊन गैरसोय होऊ नये, यासाठी राज्यभरातून नागपूरकडे येताना शहरात पोचल्यानंतर सभास्थळी कसं यायचं याची माहिती देणारे ग्राफिक्स रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. 


यात्रेत रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती


युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून युवा आणि राज्यातील सामान्य माणूस यांच्या प्रश्नांसाठी रोहित पवारांनी पुणे-नागपूर असं 800 कि.मी. हून अधिक अंतर चालत पार केले. या यात्रेत ठिकठीकाणी सामान्य नागरीक, कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा यांच्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष त्यांच्या या यात्रेत रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. 


सभेतून शक्तिप्रदर्शन? 


24 ऑक्टोबरला पुणे येथून निघालेल्या रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचे आज नागपुरात समारोप होणार आहे. दरम्यान, याचवेळी नागपूर शहरातील झिरो माईल जवळच्या टेकडी रोडवर भव्य सभा देखील पार पडणार आहे. या सभेसाठी स्वतः शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहे. सोबतच राष्ट्रवादी पक्षाचे राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील हजर राहणार आहे. त्यामुळे या सभेतून रोहित पवारांकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यासाठी एमआयएम पैसे घेऊन भाजपला मदत करते; रोहित पवारांचा गंभीर आरोप