Rohit Pawar: देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुखांकडून अडकवण्याचे काम झाले असेल तर कसे ते प्रयत्न कसे झाले हे जस्टिस चांदेवाल यांनी सांगावे. जस्टिस चांदीवाल हे आयोगाचे प्रमुख आहेत. आयोगाचे काम वस्तुस्थितीचा अहवाल देणे असते, क्लिनचिट देणे किंवा निर्णय जाहीर करणे नाही. आयोगाचे प्रमुखच निर्णय जाहीर करत असतील तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट बंद करायला हवे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणालेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना क्लिन चिट देण्यात आली नसल्याचा गौप्यस्फोट न्यायमूर्ती चांदिवाल यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी जस्टीस चांदिवाल यांच्यावर केलेल्या वक्तव्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिनचीट दिली नसल्याचा खुलासा केल्यानंतर रोहित पवार यांनी जस्टीस चांदीवाल यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ' देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुख कडून अडकवण्याचे काम झाले असेल तर तर कसे प्रयत्न झाले हे जस्टिस चांदिवाल यांनी सांगावे. जस्टिस चांदीवाल हे आयोग हे आयोगाचे प्रमुख आहे. आयोगाचा काम वस्तुस्थितीचा अहवाल देणे असते, क्लिनचिट देणे किंवा निर्णय जाहीर करणे नाही.
वाझेंच्या माध्यमातून पवार कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न
जस्टीस चांदिवालांनी केलेल्या गौप्यस्फोटात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि वाझेंकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हणलंय. शपथपत्रात वाझेनं अजित पवार, शरद पवारांची नाव घेतली. पण नाव घेणाऱ्यांचे मनसुबे ओळखून नाव रेकॉर्डवर घेतली नाहीत असं म्हणलंय. यावर रोहित पवार म्हणाले, वाझेच्या माध्यमातून भाजप कडून पवार कुटुंबियांना देखील अडकवण्याचा प्रयत्न ही वस्तुस्थिती आहे. आयोगाचे प्रमुख निर्णय जाहीर करत असेल तर हायकोर्ट,सुप्रीम बंद करायला हवे. जे पण सत्य आहे ते सत्य बाहेर यायला हवे.'
न्यायमूर्ती चांदीवाल नेमकं काय म्हणाले?
अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही. मी माझ्या अहवालात क्लीनचीट हा शब्दच वापरला नाहीय. परमबीर सिंह यांनी जी माघार घेतली, त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली आहे. पण मी क्लिनचीट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही. अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाही. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असतं, असं चांदीवल यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा:
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा