Empty Chair For Sanjay Raut At Raj Thackeray Rally: राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच यंदाची निवडणूक (Election 2024) अत्यंत चुरशीची असणार यात काही शंका नाही. निवडणुकीच्या रिंगणात मुख्य सामना महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) असा रंगणार, असल्याचं बोललं जात होतं. पण, मनसेनं (MNS) निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावर घेतलेली एन्ट्री राज्यातील दोन्ही आघाड्यांसाठी काहीसं अवघड जागेचं दुखणं होऊन बसली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार, राज ठाकरे (Raj Thackeray) एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आणि त्यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) फैलावर घेतात, पण भाजपचं नावंही घेत नाहीत. म्हणजे, राज ठाकरे आणि भाजप (BJP) पडद्याआडून एक तर नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असं असलं तरीसुद्धा राज ठाकरेंच्या मंगळवारी विक्रोळीत पार पडलेल्या सभेत मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यासाठी एक खुर्ची राखून ठेवली होती. त्या नेत्याला सभेसाठी थेट निमंत्रणच धाडण्यात आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. 


स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मनसेनं सध्या राजकीय वर्तुळात धुरळा उडवला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकापाठोपाठ एक असा सभांचा धुरळा उडवला आहे. मंगळवारी राज ठाकरेंची विक्रोळीमध्ये सभा पार पडली. या सभेसाठी मनसेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना निमंत्रण धाडण्यात आलं होतं. सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक रिकामी खुर्चीसुद्धा ठेवण्यात आली होती. त्या खुर्चीवर खास संजय राऊत यांचं नाव लिहिलं होतं. राज ठाकरेंच्या सभेचं निमंत्रण ठाकरेंच्या खासदाराला आल्यामुळे सुरुवातीला राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. पण, मनसेच्या जाहीर सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची ठेवण्यामागे एक वादाची किनार आहे.  


गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झोडल्या जात आहेत. संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात. त्यामुळे राजकीय नेत्यानं कसं बोलावं? हे ऐकण्यासाठी त्यांना विक्रोळी येथे होणाऱ्या मनसेच्या सभेला निमंत्रण धाडण्यात आल्याचं मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी सांगितलं. राज ठाकरेंकडून नेमकी भाषा कशी असावी आणि राजकारणात ती भाषा कशी वापरावी? याची माहिती घेण्याकरता संजय राऊतांनी राज ठाकरेंची सभा येऊन ऐकावी, यासाठी सभेच्या समोर ही मनसे सैनिकांनी खुर्ची ठेवली होती. 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रण