Rohit Pawar Banner : "वादा तोच, पण दादा नवा" या आशयाचे बॅनर पुण्यातील (Pune) आंबेगाव (Ambegaon) तालुक्यात झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील अजित दादांची (Ajit Pawar) जागा रोहित पवारांनी घेतली, असं दर्शवणारा हा फ्लेक्स पुणे-नाशिक महामार्गावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar Party) आमदार रोहित पवारांचे (Rohit Pawar) समर्थक मयूर भालेरावांनी (Mayur Bhalerao) हा फ्लेक्स झळकवला आहे. यामुळं बरीच चर्चा मात्र रंगलेली आहे.


अजित दादांची जागा रोहित पवारांनी घेतली


रोहित पवारांच्या (Rohit Pawar Banner) फोटोसह "वादा तोच, पण दादा नवा"हे फ्लेक्स झळकले आहेत. त्याच भागात आज शरद पवारांची जाहीर (Sharad Pawar Sabha in Pune) सभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि स्वतः रोहित पवार (Rohit Pawar Flex) सुद्धा या सभेला उपस्थित असतील. आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पराभव करण्यासाठी ही मोर्चेबांधणी सुरु आहे.


मानसपुत्र दिलीप वळसेंच्या मतदारसंघात पवारांची मोर्चेबांधणी


मंत्री दिलीप वळसे पाटील हे आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेले. मात्र, आज त्याच वळसे पाटलांविरोधात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. आज थेट वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशारितीने वळसेंना पराभूत करण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकले आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्यावर पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. पवार आंबेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शरद पवार त्यांच्या मानसपुत्राचा कोणत्या शब्दात समाचार घेतात, याकडे केवळ मतदारसंघाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून असेल.


आज थेट शरद पवारांची तोफ धडाडणार


मंचरमधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटलांवर निशाणा साधणार आहेत. कर्जत जामखेडला इथल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवण्याच्या तयारीत रोहित पवार आहेत, असा आरोप करत वळसे पाटलांनी अजित पवारांसोबत भाजपशी घरोबा केला होता. त्या आरोपाला रोहित पवार प्रतिउत्तर देतात का? हे पाहणं ही महत्वाचं असेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sharad Pawar : मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी व्यक्त केली शंका