Ravindra Dhangekar On Pune Jain Boarding House: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणाने आता निर्णायक वळण घेतले आहे. जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून माघार घेतली आहे. विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसचे (Jain Boarding House) अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला यासंदर्भात ई-मेल पाठवला होता. मात्र,आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे.पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले 230 कोटी परत मिळावेत, असा ई मेल विशाल गोखले यांनी केला आहे. त्यामुळे जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींना दिलेले 230 कोटी बुडणार का?, यासाठी धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज एक्सवर ट्विट करत 230 कोटी रुपये गोठवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. 

Continues below advertisement

पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करा, अशी मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी, अशी मागणीही रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. तसेच पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी, असंही रविंद्र धंगेकरांनी म्हटलं आहे. 

रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले? (Ravindra Dhangekar On Jain Boarding Pune)

पुण्यातील जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरने जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता त्या करारात असे नमूद आहे की, जर बिल्डरच्या बाजूने बॅक आउट झाले तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्ट ला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. तसेच अशा प्रकारचे गैर व्यवहार करणाऱ्या संबंधित ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करत शासनाने यावर प्रशासक नियुक्त करावा. या पुढील काळात ट्रस्ट चालविण्यासाठी जैन समाजातील चांगल्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची या ट्रस्टवर निवड करण्यात यावी. यात काही न्यायमूर्ती तसेच आय.ए.एस अधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात यावी. यात अजून एक पळवाट अशी आहे की, चॅरिटी कमिशनरकडे आज याबाबत सुनावणी होणार आहे,यावेळी त्यांनी पुन्हा पहिल्यासारखं राजकीय दबावात काम करत वेगळा निकाल दिला तर ही 230 कोटी रुपयांची रक्कम पुन्हा एकदा बिल्डरला देण्याचा घाट घातला जाईल, असा माझा अंदाज आहे. हे 230 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम आहे की यात पुण्यात शिकणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी दहा हजार मुला मुलींची रहिवासी क्षमता असलेले असलेले चांगले वस्तीगृह होऊ शकते, असं रविंद्र धंगेकर म्हणाले. 

Continues below advertisement

बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा- (Vishal Gokhale On Jain Boarding)

गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रम बघता मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या जागेच्या व्यवहारासंबंधी आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येथील मंदिर हे आमच्यासाठी देखील पूजनीय आहे व जैन बांधवांच्या संबंधित मंदिराविषयी असलेल्या भावनांचा आम्हाला आदर आहे. त्यामुळे, सदर मंदीर व वसतिगृहाची इमारत याविषयी जैन धर्मियांच्या असलेल्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गोखले डेव्हलपर्सच्यावतीने विशाल गोखले यांनी अधिकृतपणे दिली.

'जैन बोर्डिंग'चा घटनाक्रम- (Jain Boarding House)

15 मे 2025- ट्रस्टी आणि गोखले कंपनीत विक्री करारनामा दस्त नोंदणी 

23 जुलै 2025- ट्रस्टकडून बांधकाम आराखडा परवानगीसाठी पालिकेकडे प्रस्ताव दाखल 

8 सप्टेंबर 2025- ट्रस्ट जमिनीवर निवासी आणि व्यापारी बांधकामास परवानगी, मनपाकडून आराखडा मंजूर

6 ऑक्टोबर 2025- बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटीकडून कर्ज प्रस्तावास मंजुरी

7 ऑक्टोबर 2025- श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कडून कर्ज प्रस्तावास मंजूरी

8 ऑक्टोबर 2025- ट्रस्टी आणि गोखले कंपनीत जागा विक्री खरेदीखत दस्त नोंदणी 

8 ऑक्टोबर 2025- खरेदी खतात 230 कोटींच्या मोबदल्याचा उल्लेख, पण बाजारभाव 311 कोटी, 81 कोटींनी कमी दाखवला

8 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनी आणि बुलडाणा अर्बन (20 कोटी) व श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह (50 कोटी) यांच्यात गहाणखत दस्त

20 ऑक्टोबर 2025- धर्मादाय आयुक्तांकडून खरेदी-विक्रीला प्रकरणात जैसे थे ठेवण्याचे आदेश

24 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनी आणि बुलडाणा अर्बन व श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह यांच्यात कर्ज परतफेड दस्त

27 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनीची ट्रस्टींना ईमेल करुन व्यवहारातून माघार 

28 ऑक्टोबर 2025- धर्मादाय आयुक्तांसमोर आज पुन्हा सुनावणी 

संबंधित बातमी:

Pune Jain Boarding: डील रद्द होताच गोखले बिल्डर्सला मोठा झटका, जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींना दिलेले 230 कोटी बुडणार?