Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्य सरकारकडून एका वर्षात 43 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जुलै 2024 ते जून 2025 या काळात  43,045.06 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे. 

Continues below advertisement


आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी लाडक्या बहिणी योजनेची आकडेवारी समोर आल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेसाठीचा (Majhi Ladki Bahin Yojana) एका वर्षाचा खर्च समोर आला आहे. आर्थिक अंदाज वित्त वर्ष 2025-26 साठी सरकारने या योजनेसाठी 36000 कोटी इतका निधी ठेवला आहे. मात्र पहिल्या वर्षातील सरासरी मासिक खर्च 3,587 कोटी इतका होता. त्यामुळे जर लाभार्थी संख्या निकषानुसार आणखी कमी झाली नाही, तर याचा ताण तिजोरीवर पडणार असल्याचे चित्र आहे.


लाडक्या बहीण योजनेच्या मागील वर्षभरात किती कोटी खर्च झाला किती निधी वितरित झाला? किती लाभार्थी कमी झाले?, जाणून घ्या...



  1. योजना सुरू झाल्यापासून जुलै 2024 ते जून 2025 या काळात  43,045.06 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आल्याचा आरटीआय मधून समोर

  2. जुलैपासून अर्ज भरत असताना लाभार्थी संख्या वाढत गेली आणि एप्रिल 2025 मध्ये सर्वाधिक 2,47,99,797 (2.47 कोटी ) महिला या लाभार्थी होत्या.

  3. मात्र जून 2025 पर्यंत लाभार्थी आणि वितरित रकमेची संख्या सुमारे नऊ टक्क्यांनी घटली.

  4. निकषांच्या आधारावर जवळपास 77,980 महिला यातून वगळल्या गेल्या त्यामुळे राज्याला सुमारे 340.42 कोटींची बचत झाली.

  5. आर्थिक अंदाज वित्त वर्ष 2025-26 साठी सरकारने या योजनेसाठी 36000 कोटी इतका निधी ठेवला आहे. मात्र पहिल्या वर्षातील सरासरी मासिक खर्च 3,587 कोटी इतका होता. 


राज्य सरकारवर येऊ शकतो अधिकचा ताण- (mukhyamantri majhi ladki bahin yojana)


लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या निकषांच्या आधारावर आणखी कमी न झाल्यास मोठा आव्हान या योजनेच्या निधी वितरित करण्यामध्ये राज्य सरकार समोर येऊ शकतो किंवा अधिकचा ताण येऊ शकतो.


लाडकी बहीण योजनेचा बोजा- (Ladki Bahin Yojana)


1. जुलै 2024 ते जून 2025 दरम्यान 43 हजार 045 कोटी रुपये खर्च


2. एप्रिल 2025 मध्ये सर्वाधिक 24 लाख 79 हजार 797 लाभार्थी 


3. जून 2025 पर्यंत लाभार्थ्यांत 9 टक्क्यांची घट


4. अडीच लाख लाभार्थी वगळल्यानं 340 कोटींची बचत


5.  2025-26 साठी 36 हजार 000 कोटींची तरतूद


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील एका कार्यक्रमात सांगितलं. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सुरु केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही. सातत्यानं काही लोकं सांगतात,लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत देवाभाऊ आहे, शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:



संबंधित बातमी:


Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य