पुणे : कोथरुड (Pune) येथील निलेश घायवळ (Nilesh ghaywal) गँगप्रकरणातून भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेना नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले होते. निलेश घायवळचे आणि चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय संबंध असून त्यांच्याच पाठबळामुळे घायवळ गँग पुण्यात दहशत माजवत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. तसेच, याप्रकरणात चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या समीर पाटील यांच्यावरही धंगेंकरांनी आरोप केले होते. त्यामुळे, समीर पाटील आणि धंगेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. आता, ही लढाई कोर्टात पोहोचली असून न्यायालयाने रविंद्र धंगेकरांना (Ravindra dhangekar) समन्स बजावले आहे. 

Continues below advertisement

पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भातील वादानंतर आता पुन्हा एकदा निलेश घायवळप्रकरणाकडे आपला लढा सुरू राहिल, असे रविंद्र धंगेकर यांनी म्हटले होते. त्यातच, निलेश घायवळ प्रकरणावरुन पुण्यातील न्यायालयाने रविंद्र धंगेकर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. समीर पाटील यांनी रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. याच प्रकरणी आजपासून न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून कोर्टाने रविंद्र धंगेकर यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रविंद्र धंगेकर विरुद्ध समीर पाटील यांच्या विरोधातली लढाई आता कोर्टात सुरू झाली आहे. याप्रकरणात, 7 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावनी होणार आहे. तर 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे कोर्टाचे धंगेकर यांना आदेश आहेत. 

काय आहे प्रकरण

कोथरुडमधील गुंड निलेश घायवळ हा विदेशात पसार झाला असून त्याच्या पासपोर्टबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. अखेर, त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असून त्याला अटक करण्यासंदर्भात पुणे पोलिसांनी युकेच्या हाय कमिशनला पत्रही दिले आहे. दरम्यान, रविंद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करत समीर पाटील हे कोथरुड मधील गुन्हेगारी चालवत असल्याचे म्हटले होते. तसेच, समीर पाटील यांचा गुंड निलेश घायवळसोबतचा फोटो पुढे करत गंभीर आरोपही केले होते. त्यावर, समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रविंद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपाल उत्तर दिले. तसेच, निलेश घायवळ याच्यासमवेत माझी ओळख आहे, पण तो माझा मित्र नाही, असेही समीर पाटील यांनी म्हटलं होता. त्यानंतर, पाटील यांनी रविंद्र धंगेकरांना थेट कोर्टात खेचलं असून त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ