Ravi Rana Vs Bacchu Kadu: हा वाद आधीच मिटला आहे. आमचं काहीच भांडण नाही. नवनीत राणा यांचे आभार मानतो की, त्यांनी देखील यात आपलं मत मांडल, असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. या वाद मिटवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. यानंतरही हा वाद मिटताना दिसत नाही. यावरच माध्यमांशी बोलताना बच्चू कडू असं म्हणाले आहेत. बच्चू कडू म्हणाले की, मी सभा घेतली आभार मानले राणाजींचे, मी मुद्दामून राणाजी असं म्हणत आहे, नाही तर ते अधिक संतपणार. ते म्हणाले मला वाद वाढवायचा नाही आहे.

  


तत्पूर्वी बुधवारी रवी राणा यांनी याच विषयावर माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ''काल ते तीन वाजता म्हणाले की, हा वाद मिटला. बच्चू कडू यांनी आभार मानले आता प्रश्न मिटला असं ते म्हणाले. नंतर सहा वाजता ते म्हणतात घरात घुसून मारणार. आज काय म्हणाले, पुन्हा वाद मिटला. यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. म्हणून मी ठरवलं आहे की आता अधिक गोंधळ निर्माण होऊ नये.''


'राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आणि भाजपाला पाठिंबा दिला' 


ते पुढे म्हणाले की, त्यांनी मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला की, बच्चू कडू गुवाहाटीला गेला आणि 50 खोके घेऊन आला. हे चुकीचं आहे. ते म्हणाले, सत्ता परिवर्तन आत्ताच झालं का? याआधीही अशा घनता घडल्या आहे. तुम्हीही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले. नवनीत राणा या देखील त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आले आणि नंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. मग आम्ही असं म्हणायचं का त्यांनी भाजपासून पैसे घेतले.  


मुख्यमंत्री याना भेटून काय सांगणारा आहोत, असं त्यांना विचारलं असं ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी माझ्या मतदारसंघातला 20 हजार हेक्टर सिंचनाखाली येणाऱ्या प्रकल्पला मंजुरी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी खास करून मला फोन करून सांगितलं की, आज आम्ही तुम्हाला अधिक चांगली भेट देण्यात. यामुळे एक महिन्यात माझ्या मतदारसंघातील शेतकरी सुखावले जाणार आहेत, असं ते म्हणाले आहेत.