Ratnagiri News: रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत (Ratnagiri Nagar Parishad Election) शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) गेलेल्या माजी नगराध्यक्ष राजन साळवी (Rajan Salvi) यांचा मुलगा अथर्व साळवी (Atharva Salvi) यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे राजन साळवी यांना रत्नागिरी (Ratnagiri News) मोठा झटक्या बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement


Ratnagiri News: प्रभाग 15 मध्ये ट्विस्ट कायम 


मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेने अथर्व साळवी यांच्या ऐवजी जागा भाजपला सोडण्याची तयारी दाखवली आहे. तर दुसरा पर्याय म्हणजे भाजपमधील एखादा आयात उमेदवार घेऊन त्याला शिवसेनेत दाखल करून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या दोन पर्यायांमुळे प्रभाग 15 मधील राजकीय समीकरणांमध्ये ट्विस्ट कायम असल्याचे दिसून येते. 


Ratnagiri News: अथर्वचा प्रभाग म्हणजेच साळवी यांची ऐतिहासिक कारकीर्द


दरम्यान, प्रभाग क्रमांक 15 मधूनच राजन साळवी यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्षपद देखील राजन साळवी यांनी भूषवले आहे. तर राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी हे प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होते. मात्र शिवसेनेने राजन साळवी यांच्या मुलाला रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली आहे.


Ratnagiri News: राजन साळवी नाराज?


अथर्व साळवी यांना उमेदवारी न मिळाल्याने राजन साळवी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर प्रभाग 15 अंतिमतः कोणत्या पक्षाकडे जाणार? राजन साळवी आता काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


Maharashtra Local Body Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल


नामनिर्देशन पत्र - 10 नोव्हेंबर


अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर


छाननी - 18 नोव्हेंबर


अर्ज माघारी घेण्याची तारीख - 21 नोव्हेंबर


निवडणूक चिन्ह वाटप - 26 नोव्हेंबर


मतदान - 2 डिसेंबर


निकाल - 3 डिसेंबर


राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Solapur News: नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, भाजप नेत्याकडून अजितदादांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पाठलाग? पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं


Eknath Shinde & Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र