नाशिकराज्यातसध्यासर्वत्रआगामीस्थानिकस्वराज्य संस्थांच्यानिवडणुकांचेवारेवाहतआहे. त्याअनुषंगानेसामान्यकार्यकर्तातेपक्षातीलउच्चपदस्थनेतेकामालालागलेआहे. अशातच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर उत्तरमहाराष्ट्राच्या राजकारणात (Nashik Politics) उलथापालथ होत असल्याचं दिसून येतंय. अजित दादांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष आणि मंत्रीमाणिकराव कोकाटेंचे (Manikrao Kokate) खंदे समर्थक नामदेवराव लोंढे यांनी एकनाथशिंदेयांच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केलाय. यापक्ष प्रवेशामुळे सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना एकप्रकारे धक्का देण्यातआल्याचेबोललंजातआहे.

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश करताच नामदेवराव लोंढे यांना शिवसेनेकडून एबी फॉर्म देखीलदेण्यातआलाअसून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणूनही घोषित करण्यातआलंआहे. परिणामीआता भगूरनंतर सिन्नरमध्ये शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचेचित्रआहे.

Nashik Politics : शिवसेनेकडून एबी फॉर्म, थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणूनही घोषित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर बोलणं करून देत उपनेते विजय करंजकर आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत हा तातडीने पक्षप्रवेश करण्यातआलाय. माजी उपनगराध्यक्ष नामदेवराव लोंढे यांच्यासह सिन्नर नगर परिषदेच्या तीन माजी नगरसेवकांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाआहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मंत्री कोकाट्यांवर नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळेआता सिन्नरमध्ये महायुती स्वतंत्र लढणारअसून महायुतीतचतिरंगी लढत बघायलामिळणारआहे.

तर महायुतीतील तीन पक्ष आणि महाविकास आघाडी असे चौरंगी लढत होणारआहे. दरम्यान, खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांचा भाजपने नगराध्यक्ष पदासाठी दोन दिवसापूर्वी प्रवेश केला होता. त्यामुळेऐननिवडणुकीच्याकाळातमोठयाराजकीयघडामोडीघडतानादिसतआहे.

महत्वाच्या बातम्या: