Raosaheb Danve : युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान हे सर्वात मोठे आव्हान आहे. चार मंत्री युक्रेन-रशियाच्या आजूबाजूच्या देशात जाऊन भारतीयांना परत आणत आहेत. भारतीयांची चिंता सरकारला आहे असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल केले. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते
केंद्र सरकारचा दिलासा
भारतीय म्हणून युक्रेन, रशिया पोलीस अत्याचार करत नाही, संचारबंदीचे कोणी उल्लंघन केले, कोणी रस्त्यावर आला तर पोलीस कारवाई करत आहेत. मुलांनी घाबरू नये, सरकार त्यांना मायदेशी आणणार.असे सांगत दानवेंनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
नवाब मलिकांना आता बहादूरी कळेल
ईडीने आणलं तेव्हा शौर्य करून आल्यासारखे नबाब मलिक हात दाखवीत होते, मोठे बहादूर असल्यासारखे वाटतात, आता बहादूरी कळेल. दाऊदची जागा घेतली कशी, राष्ट्रवादी त्यासाठी उपोषण करतात, याचा अर्थ यांचे सबंध आहेत.
बॉम्बस्फोट काळात बाळासाहेब ठाकरे यांनी दाऊद विरोधात लोकांची बाजू घेतली होती. आता बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक लोकांना समजेल दाऊदशी सबंध असणाऱ्यांना उद्धव ठाकरे पाठींबा देत आहेत.
राज्यातील ग्राहकाला वीज पुरविणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे
केंद्र सरकारकडे कोळशाची मुळीच कमतरता नाही. वीज कंपनीचे नियोजन नाही, त्यामुळे टंचाई जाणवत असेल. मागील वर्षीपेक्षा यंदा जास्त कोळसा आहे. ज्या वेळी नियोजन करायला पाहिजे, त्यावेळी केले नाही. राज्यातील ग्राहकाला वीज पुरविणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, त्यांना कोळसा देण्याची जबाबदारी आमची आहे.असे दानवे म्हणाले
महाविकास आघाडीवर टीका
सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण, नरेंद्र मोदी, अमित शहा लालू प्रसाद यादव यांच्यावर कारवाई झाली तो युपीएचा काळ होता, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना यांची cbi चौकशी केली यांचा छळ केला, अमित शहा यांना जेल मध्ये टाकले तेव्हा आम्ही आरोप केले का, अमित शहा निर्दोष बाहेर आले. हे सरकार अमर अकबर एनथोनी चे सरकार, ते पायात पाय अडकून पडतील, आम्हला राजवट लागू करायची नाही आणि सरकार ही पाडायचे नाही. हे तिन्ही पक्ष एकमेकांसाठी धावून जातात. असे सांगत महाविकास आघाडीवर दानवेंनी टीका केलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Assembly Budget Session : 3 ते 25 मार्च दरम्यान यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha