रत्नागिरी : शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) उबाठा हा वाद आता नवा राहिला नाही. त्यातूनच दोन्ही पक्षातील नेतेही एकमेकांविरुद्ध लढताना पाहायला मिळतात. आमदार अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. मुंबईतील सावली डान्स बार हा गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप अनिल परब (Anil parab) यांनी केला होता. त्यानंतर, राजकीय द्वेषापोटी हे आरोप करण्यात आल्याचं योगेश कदम यांनी म्हटलं. मात्र, अनिल परब यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन डान्सबार हा योगेश कदम यांच्याच मातोश्रींचा असल्याचा आरोप करत लाज कशी वाटत नाही? असा सवालही विचारला होता. आता, शिवसेना नेते आणि योगेश कदम यांचे वडिल रामदास कदम (Ramdas kadam) यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे. 

Continues below advertisement

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपावर आता रामदास कदम यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, अनिल परब यांच्याविरुद्ध दोन दिवसांत हक्कभंग आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनिल परबने दादागिरीची भाषा करू नये, मी भीक घालत नाही. हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव, असे आव्हान रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिलं आहे. मी राज्यातले सगळे डान्सबार बंद करण्याची मोहिम हाती घेण्यासाठी योगेश कदम यांना सांगणार आहे, असेही त्यांनी म्हटले. 

अनिल परब हा अर्धवट वकील आहे, विधिमंडळात मी 32 वर्षे काम केलं आहे, प्रत्येक नियमाची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना 35 ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. तसे न करता योगेश कदम सभागृहात नसताना हे आरोप करण्यात आले आहेत. सभागृहाने हे पटलावर ठेवायला नको, नियमबाह्य काम करुन हे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे, अनिल परब यांच्यावर उद्या हक्क भंग होणार आहे. दोन दिवस सुट्टी असल्याने हक्कभंग टाकू शकलो नाही, अशी माहितीही रामदास कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 

Continues below advertisement

कदम कुटुंबाला संपविण्याचा विडा उचलला

सभागृहात जो सातबारा दाखवला तो बघायला अनिल परब यांनी त्यांच्या सगळ्या पिढ्या आणाव्यात. बाप दाखव नाहीतर श्रद्धा घाल, असे म्हणत पुरावे सादर करण्याचे चॅलेंज रामदास कदम यांनी अनिल परबांना दिले आहे. पोलिसांचे नियम पोलिसांना माहिती आहेत, त्यांनी योग्य कारवाई केली. आम्ही डान्सबार सुरू करुन लोकांचे संसार उध्वस्त केले नाहीत. राजकीय मैदानात काही जमलं नाही म्हणून उद्धव ठाकरे आता विधिमंडळात करायला बघत आहेत. उद्धव ठाकरेंनी कदम कुटुंबाला संपवण्याचा विडा उचलला आहे, पण ते कदापि शक्य होणार नाही, असेही रामदास कदम यांनी म्हटले. 

पुरावे असतील तर मुख्यमंत्र्‍यांकडे द्या

राजीनामा कसला मागता? पुरावा असेल असेल तर मुख्यमंत्र्यांकडे द्या. आम्ही कोणाकडे मांडवली केली हे अनिल परब यांनी सिद्ध करावे, आम्ही आमची प्रतिमा स्वच्छ ठेवली. जिवंत असेपर्यंत मी किंवा माझी मुले कोणताही डाग लावून घेणार नाही हा माझा शब्द आहे, असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा

शॉकिंग! रुग्णालयातील तरुणीला नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण; शिवीगाळ करत विनयभंग