Gadchiroli News : गडचिरोलीत आज माओवाद्यांची नाळ तुटली आहे. आता बोटावर मोजण्या इतके लोक जंगलात आहेत. त्यांना माझे आवाहन आहे कि त्यांनी बंदूक टाकून आता मुख्यधारेत यायला हवं. त्यात त्याचं भलं आहे. माओवाद मुक्त गडचिरोली जिल्हा आम्ही करणार आहे. जंगलातील बंदुकीचा माओवाद संपतोय, पण एका नव्या माओवाद पासून संरक्षित राहायला पाहोजे. आपण गडचिरोलीचे भूमिपूजन केले, तर दुसऱ्या दिवशी आदिवासीच्या जमिनी घेत आहेत, जमीन लुटल्या जात आहेत, असे पोस्ट सोशल मीडियावर आल्यात. याची चौकशी केल्यावर दोन जण कोलकता येथे होते, त्यातलं महाराष्ट्रातील कोणी नव्हते. त्यामुळे अशा लोकांपासून आपल्याला सावध राहिले पाहजे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलंय. गडचिरोली येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड'च्या विविध प्रकल्पांचे उदघाटन व पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते.
2 वर्षात 2 कोटी वृक्ष लावणार आणि 40 लाख वृक्ष लागवडीचा आज शुभारंभ
गडचिरोलीला स्टील हब बनवण्याचे जे स्वप्न आपण बघितले होते त्याकडे वाटचाल करत आपण निघालो आहोत. 2015 मध्ये इथे मायनिंग सुरू झाले, पण त्यावेळी अडचणी खूप होत्या. गडचिरोलीत मायनिंग सुरू करायचे पण गडचिरोलीचा उपयोग वसाहती सारखा होता कामा नये. याच ठिकाणी स्टीलची इको सिस्टम सुरू करावी लागेल, स्थानिकांना रोजगार देत असाल तर मी सहकार्य करायला तयार आहे. असे मी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीला सांगितलं. यासाठी कोनसरी गावातील लोकांनी जमिनी दिल्या. त्यात आज 14 हजार तरुण तरुणी काम करत आहेत. 12 हजारात काम सुरू केले होते, त्या महिला आज व्हॉल्वहो ट्रक ड्रायव्हर बनून 55 हजार रुपये कमवताय.
गडचिरोलीतील जल-जमीन-जंगलचा विनाश होऊ देणार नाही. कुठलेही प्रदूषण होऊ नये, महाराष्ट्रातील पहिल्या स्लरी पाईपलाईनचे उदघाटन केले आहे. ग्रीन ट्रान्सपोर्टेशन आहे, ट्रक इलेक्ट्रिक आहेत. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील ग्रीन जिल्हा आहे. आपल्याला या जिल्ह्याचे जंगल वाढवले पाहिजे म्हणून येत्या 2 वर्षात 2 कोटी वृक्ष लावणार आणि 40 लाख वृक्ष लागवडीचा आज सुरवात करतोय, अशी माहिती हि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
20 हजार लोकांना रोजगार
राजमुंदरी येथील नर्सरी प्रसिद्ध आहे, आता गडचिरोलीतही तशीच नर्सरी तयार होतेय. हे 1 कोटी झाडे केवळ कागदावर नसतील, त्यात त्यातील 80 टक्के झाडे जगलेली असतील. गडचिरोली अधिक हिरवा, अधिक नॅचरल बनवण्यासाठी आम्ही आलोय. एकात्मिक स्टील प्लांट तयार होतोय, यातून 20 हजार लोकांना रोजगार मिळेल आणि तो येत्या 30 महिन्यात पूर्ण होणार आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातुन अभियंते तयार होणार, त्यांना इथेच नोकरी मिळू शकेल. अशी अशी अपेक्षा हि देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केलीय.
आरोग्याकरिता सरकारने 5 लाखांचा विमा
जगातील सर्वात चांगले मायनिंग ऑस्ट्रेलियात होते, म्हणून ऑस्ट्रेलियाच्या कर्टन विद्यापीठात आपले विद्यार्थी शिकतील. शेयर सर्टिफिकेट पुढील 10 वर्षात महत्व कळेल, तुम्ही भागधारक होत आहात. उत्तम शिक्षण, चांगले आरोग्य प्राप्त होणार आहे. आरोग्याकरिता सरकारने 5 लाखांचा विमा दिला आहे, पण जिथे हॉस्पिटल नाही तर त्या योजनेचा लाभ कसा घेणार? त्यामुळे इथे लॉयड्स मेटल्सचे हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही 5 लाखांच्या विम्याचा लाभ देऊ, अशी घोषणा हि देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केलीय.
या प्रक्रियेत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न आहे. चीनपेक्षा कमी किमतीचा, मात्र उत्तम गुणवत्तेचे स्टील निर्माण करणार आहोत. गडचिरोली जिल्हा आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे . गडचिरोली हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून ओळखला जाईल. गडचिरोली जिल्हा माओवादी जिल्हा म्हणून ओळख होती, आता अधिकारीही गफचिरोलीत यायला तयार आहे. बाबसाहेबांच्या संविधानसोबत आम्ही आहोत हे जनतेने दाखवून दिले, असेही ते म्हणाले.
हे देखील वाचा