Raju Shetti on Eknath Shinde, Hatkanangale : " आम्ही निवडणूक जिंकली आहे. निवडणुकीसाठी मुख्यमंत्री (Eknath Shinde) कोल्हापुरात ठाण मांडून बसले असले, तरी कोल्हापूर शाहू महाराजांचा जिल्हा आहे. निकालानंतर त्यांना कळेल", असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय. आज शाहू चौकात जे झालं, ते आमच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न आहे. मात्र आमचे कार्यकर्ते शांत राहतील आम्ही निवडणूक जिंकली आहे. हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी आज इचलकरंजीमध्ये पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर ते एबीपी माझाशी बोलत होते.


राजू शेट्टी म्हणाले, शाहू चौकात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आणि महाविकास आघाडीची रॅली समोरासमोर आली होती. खरं पाहिलं तर आम्हाला, आमच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मी आमच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहन केला आहे. आम्ही निवडणूक जिंकली आहे असं राजू शेट्टी यांनी सांगितले. 


मुख्यमंत्री शिंदेंचेही शक्तीप्रदर्शन 


प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. प्रचार संपण्याच्या अवघ्या काही तास आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत इचलकरंजीला पोहोचले. इचलकरंजीमधील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर मुख्यमंत्री रोड शो मध्ये सहभागी झाले. शिवतीर्थापासून सुरू झालेल्या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने शिवसेना आणि महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. 


प्रकाश आवाडे धैर्यशील मानेंच्या प्रचारात 


दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे यांचं पूर्ण पाठिंबा धैर्यशील माने यांना मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) आज रोड शो मध्ये आपल्या वाहनातून खाली उतरून ताराराणी पक्षाचे कार्यालयाला भेट दिली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पर्यंत प्रकाश आवाडे नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) शिष्टाई करत प्रकाश आवाडे यांची मनधरणी केली होती. त्यानंतर आज प्रकाश आवाडे हे मुख्यमंत्र्यांचे रोड शो मध्ये ही सहभागी होते.


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar on Dattatray Bharne : शेतीचं पाणी बापजाद्याची इस्टेट नाही, अरे मामा जपून , तुझं सगळं काढायला वेळ लागणार नाही, शरद पवारांचा भरणे मामांवर हल्लाबोल