Rajan Patil : भावनेच्या भरात बाळराजेंकडून (Balraje Patil) न कळत काही अपशब्द गेलेत. ते अजिबात समर्थनार्थ नाहीत. अजितदादांनी (Ajit Pawar) पार्थ पवार आणि जय पवारप्रमाणे आपला मुलगा समजून बाळराजेंना माफ करावं. बाळराजेंच्या वक्तव्याबाबत मी अंतःकरणातून शरद पवार, अजित दादा आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो. असे म्हणत बाळराजे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर (Angar Nagarpanchayat Election 2025) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
Rajan Patil : बाळराजे माझ्या दृष्टीनें राजकारणात लहान, मात्र घडलेला प्रकार निंदनीय
बाळराजे माझ्या दृष्टीनें राजकारणात लहान आहे. त्यामुळे भावनेच्या आणि उत्साहाच्या भरात त्यांच्या तोंडून काही अपशब्द गेले असतील, तर वडील म्हणून पाटील कुटुंबाच्या वतीने मी या वक्तव्याबद्दल क्षमा मागतो. कारण आज जरी मी मोठ्या पवार साहेबांपासून दूर गेलो असलो तरी त्यासाठी अजित दादा करणीभूत आहेत, असं मी कधीच म्हणणार नाही. त्याला वेगळे कारणं आहेत. मी पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केलं आहे. आजवर जे वैभव उभं करण्यात आलंय त्यात शरद पवार आणि अजित दादांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. दिवंगत आर. आर पाटील यांचा विचार आम्ही चालवत आहोत. मात्र आमचं आणि आमच्या गावाचं नाव बदनाम करण्यात येत आहे. घडलेला प्रकार निंदनीय आहे. मात्र त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी मागतो. तसेच हा विषय इथेच थांबवावा, अशी विनंती करतो. असेही माजी आमदार राजन पाटील म्हणाले.
Rajan Patil : शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंबीयांची अंत:करणातून माफी मागतो
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जोरदार आनंद साजरा केला होता. यावेळी बाळराजे पाटील (Balraje Patil) यांनी अजित पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केले होते. 'अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही', असे वाक्य बाळराजे पाटील यांनी बोट दाखवत म्हटले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या टीकेनंतर आता स्वतः राजन पाटील यांनी पुढे येत दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या मुलाकडून उत्साहात किंवा भावनेच्या भारत जे वक्तव्य गेलं ते समर्थनार्थ नाही. त्यासाठी व्यक्तिशः मी अजित दादा, शरद पवार आणि पवार कुटुंबीयांची अंत:करणातून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. असेही राजन पाटील (Rajan Patil) म्हणालेत.
अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; मुलासाठी राजन पाटलांची माफी, Video:
संबंधित बातमी: