Raj Thackeray-Uddhav Thackeray: पहिले मराठीत, मग इंग्रजीत घोषणा; संजय राऊतांनी थेट अमित शाह अन् देवेंद्र फडणवीसांना केलं टॅग, ठाकरे बंधूंची बातमी दिल्लीपर्यंत पोहचवली

Raj Thackeray-Uddhav Thackeray: शाळेतील हिंदीसक्तीविरोधात आणि मराठीसाठी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू अखेर एकत्र येणार आहेत.

Continues below advertisement

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. शाळेतील हिंदीसक्तीविरोधात आणि मराठीसाठी आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्रितपणे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू अखेर एकत्र येणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

विशेष म्हणजे संजय राऊतांनी ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढण्याबाबत पहिले मराठीत ट्विट केले होते. त्यानंतर लगेच संजय राऊतांनी इंग्रजीत दुसरे ट्विट करत थेट केंद्रीयमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. जय महाराष्ट्र म्हणत, महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीसक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे हे ब्रँड आहेत, असं ट्विट करत संजय राऊतांनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले?

मला तर वाटतं, मराठी माणसाची एकत्र ताकद दिसणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी काल आवाहन केलं होतं, त्याला समोरुन प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेची गळचेपी आणि हिंदी भाषेचीसक्ती लादण्याचा प्रयत्न होतोय, त्याविरोधात मराठी माणसाने एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठी भाषा हा राजकीय मुद्दा नाही. मराठी भाषेपुढे कोणीही छोटं-मोठं नाही, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी राज ठाकरे सकारात्मक आहेत, आम्ही सगळे सकारात्मक आहोत. 5 जुलै रोजी हा मोर्चा एकत्रितपणे निघेल, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

सामनाच्या फ्रंट पेजवर राज ठाकरे-

सामानाच्या पहिल्याच पानावर आज  उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या फोटोच्या बाजूला राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा फोटो छापून "राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला" अशी बातमी सामनाने आज छापली आहे. सामनाच्या पहिल्याच पानावर ठाकरे बंधूंचा आजूबाजूला फोटो छापून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधी आंदोलनाची बातमी देण्यात आली आहे. हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी बाजूला राज ठाकरेंची भूमिकेची बातमी सामनाने आज छापली आहे.

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट! संजय राऊतांची घोषणा

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola