Raj Thackeray Speech, Shivaji Park, Mumbai : "अमित शहांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी अमित शाह आणि मीच होतो लोकांना कसं समजत? आम्ही काय बोललो? राज ठाकरेंवर 12 तास थांबण्याची वेळ आली, अशा बातम्या दिल्या जातात. वाटेल त्या बातम्या दिल्या जातात. ते पाहा राज ठाकरे चालले आहेत. हल्ली हे असतात. पूर्वी ते आचारसंहितेवाले असायचे. एकेदिवशी मी वॉशरुमला चाललो होतो. तेव्हा माझ्या मागे आला. कुठेही मोकळीक देत नाहीत. निवडणुकीच्या संदर्भात काय घडलं तर मी येऊन सांगेन ना. पत्रकार परिषद घेईल. भाषण करेन. अशा गोष्टी ठरल्यात हे सांगेन. मग हा एपिसोड कसा ठरेन. अरे मूर्खांना मला जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असत तर तेव्हाच झालो असतो. मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. 1995 वेळी जागा वाटपाच्या चर्चेत बसलो होतो. त्यानंतर मला तसं काही जमलं नाही. आमच्या निशाणीवरती लढा असं म्हणाले. हे रेल्वे इंजिन तुमच्या कष्टाने कमावलेलं चिन्ह आहे. आयत कमावलेलं नाही. चिन्हावरती कॉम्प्रोमॉईज होणार नाही. ", असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाडवा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.


महाराष्ट्रात 5 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. 


राज ठाकरे म्हणाले, जवळपास 5 वर्षानंतर महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. महापालिकाच्या निवडणुकात अजूनही होत नाहीयेत. त्याच्यामुळे 2019 ला निवडणुका झाल्या त्यानंतर आज निवडणुका होत आहेत. काल बातमी वाचली. आचारसंहितेमुळे महापालिकेतील डॉक्टर आणि नर्स यांना निवडणुकीच्या कामासाठी जुपण्यात आले आहेत. कर्मचाऱ्याची ज्यासाठी नेमणूक केली तेच कामं त्यांना करता येत नाही.  दरवेळेस निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक आणि नर्स का घेतले जातात. डॉक्टर आणि नर्स लोकांनी निवडणुकीच्या कामासाठी जाऊ नये. तुमचे कर्तव्य पार पाडावे. तुम्हाला नोकरीवरुन कोण काढतय मी बघतो. आज सणासुदीचा दिवस असूनही अशा प्रकारच्या सभा होतात. पोलीस यंत्रणेवर तणाव असतो. अशा दिवसीही पोलीस अधिकारी काम करतात. तुम्हाला गुढी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. जसं तुम्ही ऐकत होतात. 


मी अमित शहांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी अमित शाह आणि मी दोघेच होतो. मग बातम्या देणाऱ्यांना आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांना आत काय घडलं हे कसं समजतं? आम्ही काय बोललो? राज ठाकरेंना 12 तासांची वेळ आली अशा बातम्या दिल्या जातात. वाटेल त्या बातम्या दिल्या जातात. ते पाहा राज ठाकरे चालले आहेत. हल्ली हे (मीडियावाले) असतात. पूर्वी ते आचारसंहितेवाले असायचे. एकेदिवशी मी वॉशरुमला चाललो होतो. तेव्हा माझ्या मागे आला. कुठेही मोकळीक देत नाहीत, असं म्हणत राज ठाकरेंनी माध्यमांवर टीका केली.


तीन आठवड्यांपूर्वी अमित शाहांसोबत झाली होती बैठक 


राज्याच्या महायुतीमध्ये आता मनसेचा समावेश होणार असल्याच्या चर्चा गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु आहेत. राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीत बैठक पार पडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी “मला दिल्लीत बोलावलं, मी आलो”, असं म्हटलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सामील होणार अशी चर्चा सुरु होती. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट सिक्रेट, जवळच्या नेत्यांनाही थांगपत्ता नाही, गुढीपाडवा मेळाव्यात गेमचेंजर घोषणा करणार?