Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: ठाकरे बंधूंच्या युतीचे प्रस्ताव, टाळ्या, हाळ्या एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक एक तासभर बैठक झाली.
सकाळी 10.35 ते 11.35 एवढा संपूर्ण तासभर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ चर्चा झाली. आगामी मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा रंगात आली होती. मात्र युतीचा प्रस्ताव पहिले कोण पाठवणार यावरही एकीकडे नाट्य रंगलं होतं. मात्र त्याआधी अचानक ही गुप्त भेट या दोन नेत्यांमध्येही झाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी या गुप्तभेटीद्वारे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिल्याचं मानलं जातंय.
फडणवीस-राज भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते काय काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीतील तपशील अजून बाहेर आलेला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं. मनसेसोबत जाण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत आणि तसं उद्धव ठाकरे यांनी आधी स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली. मात्र भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची अधिकृत माहिती आलेली नाही. राज ठाकरे यांना महायुतीमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न भाजपा करत असेल, तर यावर मी काय बोलू शकत नाही. मी माझ्या पक्षाबद्दल बोलेल. आमची सगळ्यांची इच्छा आहे की मनसेसोबत युती व्हावी, असं उदय सामंत म्हणाले.
ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट कोणत्या विषयावर आहे, यावर लगेच भाष्य करणं चुकीचं ठरेल. राज ठाकरेंनी पहिली साद घातली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सगळी भांडणं मिटवायला तयार असल्याचं सांगितलं. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील मनसे-ठाकरे गटाच्या युतीसाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या भेटीवर लगेच भाष्य करणं चुकीचं ठरेल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
राज ठाकरे- देवेंद्र फडणवीस भेटीची टाईमलाईन-
सकाळी 9.40 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये....
सकाळी 10.35 - मुख्यमंत्री फडणवीस ताज लँड्स एंडमध्ये दाखल...
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नसतानाही बैठक अचानक ठरली.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा असतानाच अचानक राज आणि फडणवीसांची भेट...
सकाळी 11.35 - मुख्यमंत्री फडणवीस हॉटेलमधून निघाले.
सकाळी 11.55- राज ठाकरे हॉटेलमधून निघाले.
देवासोबत की भावासोबत, राज ठाकरे कुणाला टाळी देणार?, VIDEO:
संबंधित बातमी: