मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच मतदार संघाची तयारी सध्या मनसे कडून केली जाते. याच दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीचं रणशिंग ते मराठवाड्यातून फुंकणार आहेत. शिवाय, यामध्ये सोलापूरच्या दौऱ्याचाही समावेश असणार आहे. 


राज ठाकरे 4 ऑगस्ट पासून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. हा दौरा 13 ऑगस्ट पर्यंत हा दौरा सुरू असणार आहे. यामध्ये चार ऑगस्टला ते सोलापूर येथे असतील तर 5 ऑगस्टला धाराशिव येथे, तर 6 ऑगस्ट ला ते लातूरला, तर सात ऑगस्टला ते नांदेडला, तर 8 ऑगस्टला ते हिंगोलीला, 9 ऑगस्ट ला ते परभणीला, 10 ऑगस्टला ते बीडला, 11 ऑगस्टला ते जालन्याला, 12 आणि 13 ऑगस्टला ते संभाजीनगरला असतील. या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे हे पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेतील तसेच निरीक्षकांनी ज्या मतदार संघाची चाचपणी केली आहे.  त्या दृष्टीने चर्चा करतील. तसेच या बैठका आणि या दौऱ्या दरम्यान विविध ठिकाणी ते पत्रकारांशी व इतर संघटना प्रतिनिधी व नेत्यांशी देखील संवाद साधतील.


विधानसभा निवडणुकीत कोणतीही युती नाही, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना तयारी लागण्याचे आदेश 


राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. कोणाशी युती होईल किंवा आपल्यासाठी कोणती जागा सुटेल, याचा विचार करत बसू नका. आपल्याला 225 ते 250 जागा लढवायच्या आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आता महायुतीचे नेते राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी शिवतीर्थवर जाणार का, हे पाहावे लागेल, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. 


तसेच मनसे सोडण्याच्या तयारी असलेल्या  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी भाष्य केले. मी विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची यादी बघत होतो. कोण कुठल्या पक्षात आहे, हेच कळत नाही. आपल्यातील काही लोकही जाण्याच्या तयारीत असल्याचे चर्चा आहे. मी त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालेन, त्यांनी खुशाल दुसऱ्या पक्षात जावे आणि स्वत:चे नुकसान करुन घ्यावे, असेही राज ठाकरे म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rohit Pawar on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी सांभाळून बोललं पाहिजे, गाडीवर हल्ला झाल्यानंतर रोहित पवारांचा घरचा आहेर