Raj Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेमधील किस्सा देखील सांगितला. गेले 20-25 दिवस परदेशात होतो. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला बोलावलं होतं. तिथे इंटरव्ह्यू झाला. तिकडे एक मुलगा येऊन मला भेटला तो म्हणाला माझ्या हॉटेलला चला, त्याने आग्रह केला. मला म्हटलं तुमची भाषणे ऐकून लहानपणी प्रेरणा घेतली आणि अमेरिकेत हॉटेल सुरु केलं. त्या हॉटेलमध्ये जाऊन मी खरच थक्क झालो. असंख्य लोक मला तिकडे भेटले, असं राज ठाकरेंनी सांगितले. 


परदेशात इतकी जंगले आहेत..कॅनडा आणि अमेरिका यात पाच तलाव आहेत. तिथे देशभरात असंख्य तलाव आहेत. यूरोपातही आहेत. आकाशातून दिसणारे जे पाच तलाव आहेत. त्यात हे पाच तलाव आहे. किती मोठे आहेत हे पाहा. या पाच तलावातील टिंब तुम्ही गुगगलवर पाहा. तिथे टिंब दिसतो. तो नायगरा फॉल्स आहे. जगातील सर्वात मोठा धबधबा हा टिंबासारखा दिसतो. इतके तलाव इतक्या गोष्टी असून इतकं मुबलक पाणी असून ते कागदाने पुसतात. आणि आमच्याकडे पाऊस कधी पडणार, धरणं कधी भरणार. आपल्याकडे दुष्काळ पडेल असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय, असं राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरेंचं मिश्किल भाषण, परदेशातील भन्नाट किस्से-


पाण्यापासून ते टॉयलेटपेपर पर्यंत जाणं सोपं नाही. मराठीत म्हण आहे, ज्याची जळते, त्यालाच कळते...परदेशात गेल्यावर सकाळ्या वेळेला खूप हालत होते, तुम्हालाही माहिती असेल. सर्व फिरून वैगरे मी हॉटेलमध्ये आलो आणि बाथरुममध्ये गेलो. बाथरुममध्ये शिरल्यानंतर माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला. तो जेटस्प्रेबघून आनंदाश्रू आवरेना त्याला, असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 


विधानसभा निवडणुकीत कोणतीही युती नाही: राज ठाकरे


राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. कोणाशी युती होईल किंवा आपल्यासाठी कोणती जागा सुटेल, याचा विचार करत बसू नका. आपल्याला 225 ते 250 जागा लढवायच्या आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आता महायुतीचे नेते राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी शिवतीर्थवर जाणार का, हे पाहावे लागेल. तसेच मनसे सोडण्याच्या तयारी असलेल्या  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी भाष्य केले. मी विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची यादी बघत होतो. कोण कुठल्या पक्षात आहे, हेच कळत नाही. आपल्यातील काही लोकही जाण्याच्या तयारीत असल्याचे चर्चा आहे. मी त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालेन, त्यांनी खुशाल दुसऱ्या पक्षात जावे आणि स्वत:चे नुकसान करुन घ्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.


व्हिडीओ-



संबंधित बातमी:


Raj Thackeray: विधानसभेत कोणतीही युती नाही...; राज ठाकरेंची मोठी घोषणा, काय-काय म्हणाले?, पाहा 10 महत्वाचे मुद्दे