Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे भव्य मेळावा घेऊन एकाच व्यासपीठावरुन ही घोषणा करतील. यावेळी मनसे (MNS) आणि ठाकरे गटाकडून मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी केली जात आहे. 23 डिसेंबरपासून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यापूर्वी म्हणजे येत्या सोमवारपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांच्याकडून संयुक्त मेळावा घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे सांगितले जाईल. (Shivsena MNS Alliance)
राज आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमीलन झाले असले तरी त्यांच्या दोन्ही पक्षांची युती कधी होणार, याकडे शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. त्यांची ही प्रतीक्षा येत्या दोन-तीन दिवसांत संपू शकते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावरुन युतीची घोषणा केल्यास शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल. याचा फायदा मुंबई, ठाणे, नाशिक महानगरपालिकेत होईल, असा दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळेच ठाकरे बंधूंनी (Thakeray Brothers) पुन्हा एकदा ग्रँड शो करत युतीची घोषणा करावी, असा मनसे आणि ठाकरे गटातील नेत्यांचा आग्रह असल्याचे समजते. (BMC Election 2026 news)
मनसे-ठाकरे गट युतीची अधिकृत तारीख अद्याप ठरली नसली तरी 22 तारखेच्या आत युती जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. युतीची घोषणा करत असताना ठाकरे बंधूंकडून उमेदवारांची यादी आणि निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. सध्या ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. हे जागावाटप पुढील दोन-तीन दिवसांत अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहिली उमेदवारी यादी युतीच्या घोषणेवेळीच प्रसिद्ध करण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न असल्याचे समजते. (Mahrashtra Politics news)
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम, मतदान कधी अन् निकाल कधी?
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरअर्जाची छाननी - 31 डिसेंबरउमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारीचिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारीमतदान - 15 जानेवारीनिकाल - 16 जानेवारी
आणखी वाचा