Eknath Shinde :  सत्ता येते जाते नाव परत येत नाही असे बाळासाहेब म्हणायचे. माझ्या रक्तातला थेंब असेपर्यंत काम करणार आहे. बाळासाहेबांचा वारसा जपणारे नगरपरिषद निवडुकीत कुठे होते? असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सभा प्रचार केला नाही. मुंबई सोन्याची अंडी देणारी आहे, ती मुंबई सोडली नाही. अरे बाबा फेसबुक लाईव्ह घ्यायची असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी चमत्कार केला

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आहे. लाडके भाऊ त्यांचं देखील अभिनंदन करतो. निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुपारी फुटली आहे, लगीन घाई सुरू झाली असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ठाणे  हे खणखणीत नाणे आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी सांगितले आहे. गेली अनेक वर्ष ठाणे येथे भगवा फडकत आहे. कोणीही हा भगवा उतरु शकत नाही. हा बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा भगवा आहे. गुलाल आपलाच उधळणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

कार्यकर्ते हीच ताकत आणि टॉनिक

कार्यकर्ते हीच ताकत आणि टॉनिक आहे. ठाणे इतिहास घडवतो सर्वांनी पाहिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाणे हे जगभरात दाखवून दिले. 32 देशाने याची नोंद घेतली, हू इज एकनाथ शिंदे? महाराष्ट्रात जनतेने स्वीकारलं. धनुष्य बाण आपला आहे. लोकसभेत आणि विधान सभेत आपण जास्त जागा जिंकलो.घोडे फरार , टांगा पलटी यंदा देखील करायचा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. नगरपालिका, नगरपरिषद मध्ये जास्त जागांवर लढलो. कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मला लाडक्या बहिणीचा अभिमान आहे.

Continues below advertisement

महाराष्ट्र आता पायाभूत सुविधामध्ये अग्रेसर आहे. समृद्धी महामार्ग याला देखील विरोध केला होता.देवेंद्र फडणवीस यांनी मला जबाबदारी दिली. आपण सर्व प्रकल्प  गेम चेंजर केले. कोस्टल रोड करत आहे. वाहतूक कोंडी दूर होणार आहे. आयफेल टॉवर करत आहोत. मेट्रो येत आहे. ठाणे बदलत आहे.  लाडकी बहिण , लखपती  योजना अनेक विकासकामे केली आहेत. सर्वात आवडती योजना लाडकी बहिण योजना आहे. 

जो शब्द देतो ते करतो

जो शब्द देतो ते करतो. कोणीही कितीही मायकालाल आला तरी काहीही होणार नाही. राजकारणामध्ये शब्दाला मोल आहे काही जण पाळत नाहीत. म्हणून लोक आपल्यासाठी येत असतात. सत्ता येते जाते नाव परत येत नाही असे बाळासाहेब म्हणायचे. माझ्या रक्तातला थेंब असेपर्यंत काम करणार आहे. बाळासाहेबांचा वारसा जपणारे नगरपरिषद निवडुकीत कुठे होते? असा सवाल करत एकनाथ शिंदेंची उद्दव ठाकरेंना टोला लगावला. सभा प्रचार केला नाही. मुंबई सोन्याची अंडी देणारी आहे, ती मुंबई सोडली नाही. अरे बाबा फेसबुक लाईव्ह घ्यायची असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. देशभर शिवसेना पोहोचत आहे. इथे कोणी मालक नाही. काही जण आपल्याला गुलाम समजत आहे. हो जनता मालक आहे. जनता त्यांची जागा दाखवणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्याला जनतेने साथ दिली आहे. जनता उंच शिखर घेऊन जाते. हिच जनता खाली आपटतेसंवेदना काय असते ते त्यांना माहिती नाही. दसऱ्याच्या दिवशी आपण पूरग्रस्तांना मदत केली आहे. ही बांधिलकी आहे. शिवसेना धाऊन जाते. आपण पहेलगाम, उत्तराखंड, केरळमध्ये गेलो होतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.