Raj Thackeray & Uddhav Thackeray alliance news: राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र आले आहेत. येत्या 5 जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात हे दोघेही सहभागी होणार आहेत. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येत असल्याने मनसे व ठाकरे गट दोन्ही बाजूचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale)यांनी केलेल्या एक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. गजानन काळे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन भाजपच्या अंतर्गत वर्तुळातच प्रचंड खदखद असल्याचा दावा केला आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाही हिंदी सक्तीचा निर्णय मान्य नाही. आता तरी भाजपचे भैय्ये ऐकणार आहेत का? भाजपातील स्वाभिमानी मराठी पदाधिकाऱ्यांना आवाहन ... मोर्चात या...", असे गजानन काळे यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भूमिकेला वरळीतील शाळेचा पाठिंबा
राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात घेतलेल्या भूमिकेला आता शाळांकडून देखील पाठिंबा मिळत आहे. वरळी येथील लिटिल स्टार स्कूलने आज आम्हाला पाठिंबा देत कोणत्याही परिस्थितीत हिंदी सक्ती नको. सहा वर्षाच्या मुलाला हिंदी भाषा शिकताना अडचणी येऊ शकतात त्यामुळे हिंदी सक्ती नको, अशी भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे. राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. म्हणून आमच्या शाळेने पाठिंबा दिला आहे. आमच्या शाळेत केजीपासूनचे वर्ग आहेत. आम्हाला अंदाज आहे की मुलांना शिकताना किती अडचणी येतात. त्यातच त्यांना आणखी एका भाषेची सक्ती अडचणीची ठरू शकेल, अशी प्रतिक्रिया या शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली.
शाळेच्या या भूमिकेला मनसेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सरकारने शाळांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, हे लक्षात ठेवावे. दोन्ही भाऊ एकत्र आले आनंद आहे. आपण आता पाहू शकाल मराठी माणसाच्या हितासाठी 5 तारखेला भव्य दिव्य मोर्चा आपल्याला पाहिला मिळेल, असे मनसेने म्हटले आहे.
Dada Bhuse: दादा भुसे काल भाजपचा अजेंडा घेऊन आले होते, मनसेच्या अविनाश जाधवांची टीका
हा मोर्चा भूतो न भविष्यती असा मोर्चा असेल, भाषेसाठी निघणारा हा मोर्चा असेल, आता मोर्चा होईल बाकी, पुढच्या ज्या घटना आहेत त्यावर राज साहेब आणि उद्धव साहेब बोलतील. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे बोलण्यासाठी काही नव्हते, ते काल भाजपचा एजेंडा ते घेऊन आले होते. राज ठाकरे यांच्या प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तरे नव्हती, त्याच गोष्टी ते रिपीट करत होते, राज ठाकरेंकडे येताना थोडा अभ्यास करून यायला हवे होते. अनेकांची इच्छा होती, हिंदी सक्तीच्या विरोधात अनेक कलाकार, लेखक, साहित्यिक एकत्र येणार आहेत. मला कालपासून फोन सुरू झाले आहेत, इतर पक्ष देखील येतील, त्या सर्वांची एक बैठक आम्ही घेऊ आणि मोर्चा संदर्भात दिशा ठरवू. ठाण्यात 29 किंवा 30 तारखेला एक बैठक होईल त्यात सर्व पक्ष आणि कलाकार यांची बैठक ठेऊ, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले.
आणखी वाचा