Congress Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा आजपासून सुरु होत आहे. कन्याकुमारी येथून सुरु झालेली ही यात्रा देशभरात 3570 किमीचा प्रवास करत काश्मीर येथे संपणार आहे. या यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी हे करत आहेत. ही यात्रा देशभरातील विविध राज्यातून जाणार आहे. यावेळी राहुल गांधी बऱ्याच ठिकाणी चौकसभा देखील घेणार असल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. अशातच या यात्रेदरम्यान राहुल गांधी ही महाराष्ट्रातही येणार आहेत. यावेळी ते हिंगोलीत येणार आहे. राहुल गांधी जिल्ह्यामध्ये 80 किमी प्रवास करतील. याच बरोबर आहाराष्ट्रातमध्ये ते जळगाव जामोद आणि नांदेड येथे सभा घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते माणिक ठाकरे यांनी दिली आहे.


याच अनुषंगाने माणिक ठाकरे हे प्रशिक्षण आणि संबोधन करण्यासाठी हिंगोलीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, केंद्रातले भारतीय जनता पक्षाचे सरकार हे जण हिताचे नाही. सविधानाच्या विरोधातल आहे. संविधानाणे दिलेले अधिकार संपुष्टात आणणारे सरकार त्या ठिकाणी बसलेले आहे. म्हणून या सरकाराला सत्तेपासून बाजूला सारले पाहिजे,  ही भूमिका जनतेची आहे. 


अशोक चव्हाण कॉग्रेस सोबत सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा असतांना काँग्रेस नेते माणिक ठाकरे यांनी अशोक चव्हाण पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याच नसल्याचे स्पष्टपणे सांगितलं आहे. ते पक्ष सोडणार, असं म्हणत त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जात आहे. महाराष्ट्रातील एक नंबरच नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे बघितलं जाते. ते असा विचार करूच शकणार नाहीत. विरोधी पक्ष त्यांच्याबद्दल अपप्रचार करत आहे, असं काँग्रेस नेते माणिक ठाकरे म्हणाले.


दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसने या यात्रेची तयारी सुरु केली होती. याचदरम्यान काँग्रेसच्या  पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक ही जाहीर करण्यात आली. मात्र ही निवडणूक लढवण्यास राहुल गांधी इच्छित नसल्याचं सूत्रांनी सांगितलं होत. मात्र भारत जोडो यात्रेचं नेतृत्व करत काँग्रेसमध्ये नवीन पक्षाध्यक्ष कोणी झालं तरी कमांड ही कोणाच्या हातात असणार आहे, हे न सांगतच संदेश देण्यात आला आहे. काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्याची कवायत असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. अशातच 2024 च्या लोकसभा निवणुकीत काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेचा पक्षाला काही फायदा होईल का, हे तेव्हाच समजू शकणार आहे.