INDIA Alliance Sabha at Shivaji Park : मुंबई : इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) शिवाजी पार्कवरील (Shivtirth) सभेत हिंदु-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक पाहायला मिळालं. शिवाजी पार्कात सभेसाठी जमलेल्या मुस्लिम बांधवानी रोजा सोडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने शिवाजी पार्कवरून रणशिंग फुंकलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी शिवाजी पार्कवर समारोप झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते सभास्थळी उपस्थित होते.
शिवतीर्थावर रोजा सोडला
शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या सभेसाठी जमलेल्या मुस्लिम बांधवानी शिवतीर्थावरच रोजा सोडला. गांधी-ठाकरेंच्या सभेत ऐक्याचं प्रतिक पाहायला मिळालं. सभा सुरु असताना सभेसाठी जमलेल्या मुस्लिम बांधवानी शिवाजी पार्कवरच रोजा सोडला. इंडिया आघाडीच्या सभेसाठी शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव दाखल झाले आहेत. राज्यासह देशभरातील इंडिया आघाडीचे समर्थक शिवतिर्थावर पोहोचले असून यामध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे. इंडिया आघाडीच्या सभेत हे ऐक्याचं प्रतिक पाहायला मिळत आहे.
इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी
राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, एमके स्टालिन, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, काँग्रेस नेते अशोक गेहलोत, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सचिन अहिर, जम्मू काश्मीरच्या नेत्या महेबुबा मुफ्ती या दिग्गज नेते शिवाजी पार्कात सभेसाठी उपस्थित आहेत.