Rahul Gandhi on PM Narendra Modi : जगाला महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविषयी सिनेमाच्या माध्यमातून माहिती मिळाली. रिचर्ड एटनबरो यांनी 1982 मध्ये यांचा 'गांधी' हा सिनेमा बनवला. त्यानंतर जगभरातील लोकांना महत्मा गांधींविषयी माहिती मिळाली. तोपर्यंत जगाला गांधींबाबत जास्त माहिती नव्हते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला होता. एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत पीएम मोदींनी महात्मा गांधी यांच्याबाबत काही दावे केले होते. दरम्यान पीएम मोदींच्या दाव्यांना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


काय म्हणाले राहुल गांधी ? 


पीएम मोदींना प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, शाखांमध्ये ज्यांचा जागतिक दृष्टीकोन बनतो, ते गांधीजींना समजू शकत नाहीत. ते गोडसेला समजतात. ते गोडसेंच्या रस्त्याने चालतात. गांधीजी संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होते. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइनस्टाइन या सर्वांनी गांधींपासून प्रेरणा घेतली. हिंदुस्तानातील करोडो लोक गांधींजींचा मार्ग स्वीकारतात. आहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालतात. लढाई सत्य आणि असत्यामध्ये आहे. हिंसा आणि आहिसेंमध्ये ही लढाई आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 


नरेंद्र मोदी काय काय म्हणाले होते?


महात्मा गांधी जगातील महान आत्मा होते. या 75 वर्षात गांधीजींबद्दल जगाला माहिती देण्याची जबाबदारी आपली नव्हती का? त्यांच्याबद्दल जगात कोणालाही माहिती नव्हती. मला माफ करा. पण जेव्हा 'गांधी' हा सिनेमा तयार झाला. तेव्हा जगभरातील लोकांना महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा सुरु झाली. जर जग मार्टिन ल्युथर किंग,नेल्सन मंडेला आणि अन्य नेत्यांबाबत जाणते. पण गांधीजी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. तुम्हाला हे स्वीकारावे लागेल. मी जगभरात फिरल्यानंतर हे सांगत आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar on Anjali Damania : निर्दोष निघालो तर तिने गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, मीडिया समोर यायचं नाही, नार्को टेस्टसाठी अजितदादांचे अंजली दमानियांना प्रत्युत्तर