पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवेसना यांच्यात जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना या चर्चेतून डावलण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली होती. त्यामुळं आजच्या बैठकीचं त्यांना आमंत्रण नसल्याचं समोर आलं आहे.    

Continues below advertisement

भाजप शिवसेना बैठकीला सुरुवात  झाली आहे. पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये दोन्ही पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, धीरज घाटे, निलम गोऱ्हे, विजय शिवतारे, नाना भानगिरे यांच्या उपस्थित बैठकीला सुरुवात झाली आहे.  पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षात चर्चा करण्यात येत आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी जागांच्याबाबत भाजप आणि शिवेसना यांच्यातील चर्चेला सुरुवात झाली आहे. भाजपवर टीका करणे रवींद्र धंगेकर यांना भोवल्याचं बोललं जातंय. पुण्यातील भाजप शिवसेना पक्षाच्या बैठकीला रवींद्र धंगेकर यांना आमंत्रण देण्यात आलं नाही.

Continues below advertisement

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या बैठक सुरु आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर रवींद्र धंगेकर यांच्याकडे शिवसेनेचे पुणे शहराचे महानगर प्रमुखपद  देण्यात आलं आहे. मात्र, भाजप मधील नेत्यांवर टीका केल्याने आज त्यांना बैठकीचे आमंत्रण नाही, अशी माहिती आहे. 

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांना शिवसेनेकडून डावललं जातंय?

पुण्यात भाजप नाही तर शिवसेनेकडून रवींद्र धंगेकरांना डावलण्यात येत आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण भाजपने भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिलं आहे अशी माहिती भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे. तर शिवसेनेने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना दिल्याची माहिती आहे. धंगेकरांना शिवसेनेच निमंत्रण दिलं नसल्याचं समजतंय. महायुतीत 35-40 जागांसाठी शिवसेना भाजपकडे प्रस्ताव देणार आहे, अशी चर्चा आहे आणि रविंद्र धंगेकर मात्र 165 जागा लढवण्यावर ठाम आहेत.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यानच्या काळात रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर काही काळ शांत होते. मात्र, जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता.