पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे जवळजवळ निश्चित झालं आहे. त्या अनुषंगाने भाजपची पहिली महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. मात्र या बैठकीला शिवेसना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना पुण्यातील भाजप शिवसेनेच्या जागावाटपाच्या चर्चेला बोलावण्यात आलं नसल्याने अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यावर आता स्व:त शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या राहत्या घरी पुण्यातील भाजपच्या सर्व आमदारांसह शहर निवडणूक प्रमुखांची बैठक बोलवल्याची माहिती आहे.
Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी "डिनर डिप्लोमसी"
पुण्यातील या बैठकीला भाजपचे सर्व आमदारांसह शहर निवडणूक प्रमुख होते उपस्थित. यावेळी भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. ज्यामध्ये महापालिका निवडणुकीची तयारी, स्थानिक जागा वाटप, शिवसेनेशी झालेली युती, विजयाची रणनीती अशा विविध विषयांवर बैठकीत विचार मंथन झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, मुंबईत युतीची बैठक पार पडल्यानंतर येत्या 3-4 दिवसात यादी जाहीर होण्याची शक्यताही आता वर्तविण्यात आली आहे.
Ravindra Dhangekar : बैठकीसाठी बोलवलं नव्हतं तरी मी नाराज नाही
पुण्यातील महायुतीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा 40 वर्षांचा गड हादरवणारे रवींद्र धंगेकर यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर आता स्व:ता रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिलाय. पुणे महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढणार आहे. लवकरच शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होईल. रवींद्र धंगेकर म्हणनू जरी मला काल बैठकीसाठी बोलवलं नव्हतं तरी मी नाराज नाही. रवींद्र धंगेकर नाराज नाहीत, जे पक्षाचं आदेश असेल ते मला मान्य आहे. शिवसेनेला किती जागा मिळणार याबाबत आज आम्ही एक महत्त्वाची बैठक घेतोय, त्यानंतर पुन्हा भाजपसोबत बैठक होईल. अशी माहिती रवींद्र धंगेकर यांनी यावेळी दिली.
Ravindra Dhangekar on Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळवर मी नाराज नाही, तो विषय तिथंच संपला
मंत्री उदय सामंत काल रात्री पुण्यामध्ये आले होते. त्यांना मी माझं म्हणणं सांगितलं आहे. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळायला हव्यात, कार्यकर्त्यांवर अन्याय नको. असेही ते म्हणाले. मुरलीधर मोहोळ वर मी नाराज नाही. जैन हॉस्टेलची जागा त्यांना परत मिळाली, तो विषय तिथंच संपला. आम्ही सुद्धा भाजपासाठी प्रचार करू त्यांच्याकडून देखील तीच अपेक्षा आहे. असे देखील रवींद्र धंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हे देखील वाचा