पुणे : बीड (Beed) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार सुरेश धस यांनीच हलाले घडवून आणल्याचा थेट आरोप राम खाडे यांच्या पत्नीने केला होता. त्यानंतर, आता आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा पुण्यातील नावाजलेले वकील ॲड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी केला आहे. धस यांच्या समर्थकांनी ज्या खाडे नावाच्या व्यक्तीला मारहाण केली, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडून आपल्याला ही माहिती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

बुधवारी सायंकाळी 7 वाजता माझे पतीसोबत फोनवर बोलणे झाले होते, रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी येणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर, त्यांच्यावर हल्ला झाल्याचे मला समजल्याचे राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी सांगितले. आता, अॅड. असीम सरोदे यांनही सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार सुरेश धस यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले. बीड जिल्ह्यात राम खाडे कार्यरत आहेत, गेल्या 5 वर्षांपासून माझे आणि त्यांचे संबंध आहेत. ज्यावेळेस देवस्थानच्या जमिनीच्या संदर्भातील भ्रष्टाचार त्यांनी कागदपत्रांच्या आधारे माझ्या लक्षात आणून दिला, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दिल्या होत्या. पोलिसांकडेही तशा तक्रारी दिल्या होत्या. राम खाडे यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. त्यानंतर, ते माझ्याकडे आले असता, तब्बल 1000 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून झालेला आहे. देवस्थानच्या जमिनी त्यांनी स्वत:च्या खासगी लोकांच्या नावाने त्यांनी करुन घेतल्या आहेत. त्यामध्ये, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात आम्ही मुंबईतील ईडीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. मात्र, ईडीनेही भाजप आमदार असल्याने कदाचित त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. पोलिसांनीही दखल घेतली नाही. अखेर संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात खाडे यांनी धाव घेतली. त्यानंतर, उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, कुणालाही पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही. 

माझ्याही जीवाला धोका - सरोदे

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राम खाडे यांच्या शेतातील शेडवर हल्ला करण्यात आला, त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला करण्यात आला. राम खाडे यांनी विविध विभागात अर्ज करुन, नेत्यांना भेटून स्वत:साठी संरक्षण मिळवलं. मात्र, ते संरक्षण काढून घेण्यात आलं. विशेष म्हणजे कालच राम खाडे यांच्यावर निर्घृणपणे हल्ला करण्यात आल्याची माहिती आज मला मिळाली. याशिवाय, माझ्या देखील जीवाला धोका असल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं. राम खाडेंसारख्या व्यक्तीचं संरक्षण झालं पाहिजे, अशी भावनाही सरोदे यांनी व्यक्त केली.   

Continues below advertisement

हेही वाचा

पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग