Prithviraj Chavan on US-India Tariff War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि चीन या सारख्या देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वस्तूंच्या आयातीवर जितका टॅरिफ एखादा देशाला लावेल. त्यांच्या देशातून आयात केल्या जाणाऱ्या आयातीवर तितकाच टॅरिफ लावू. ही प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरु होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी धोक्याचा इशारा दिलाय. मोदींनी (PM Narendra Modi) ट्रम्पसमोर लोटांगण घातलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर (Farmers) अनिष्ट परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

प्रथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मला भीती आहे, जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल, तेव्हा भारत सरकारने लोटांगण घातलं तर देशातील शेतकऱ्यांना कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही. देशातल्या शेतकऱ्याची प्रचंड अनास्था होईल. संसदेत आमचे खासदार बोलले, आपण जर दोन एप्रिल रोजी ताठ भूमिका घेतली नाही तर त्याचा भारतीय शेतीवर अनिष्ट परिणाम होईल. हे आयात-निर्यात कराचं जागतिक व्यापार संघटनेचे शब्द आहे. पण परिणाम गरीब शेतकऱ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.

मोदींनी लोटांगण घालायचं ठरवलं असेल तर...

प्रथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, आपले मंत्री वाटाघाटी करताना ट्रम्प साहेबांच्या दरबारात भीक मागायचं काम करतात. फक्त व्यापारमंत्री जात आहेत. तुम्ही कृषी मंत्र्यांना घेऊन जा, उद्योग मंत्र्यांना घेऊन जा. त्यामुळे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करेल, जमेल की नाही हे माहिती नाही. कारण मोदींनी लोटांगण घालायचं ठरवलं असेल तर कृषीमंत्री, उद्योगमंत्री काय करणार? असा देखील त्यांनी म्हटले. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम

2 एप्रिलला अमेरिकेने व्यापार युद्ध सुरु केले तर  भारतावर अनिष्ट परिणाम होतील. भारत सरकारने काहीही तयारी केलेली नाही. याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असा धोक्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. तर कर्जमाफी महत्वाची होती, मात्र ती झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Donald Trump : संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धडकी भरवणाऱ्या वक्तव्यानं खळबळ

F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल