सातारा : छत्रपती संभाजीराजेंचा बलिदान दिवस म्हणून 29 मार्च रोजी संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रात सर्वच शिव-शंभूभक्तांनी संभाजीराजेंच्या बलिदानाच्या इतिहासाला उजळणी देत त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची आठवण काढली. तसेच, विविध उपक्रमक, सामाजिक कार्याच्या माध्यमातून शंभूराजेंच्या स्मृतींना अभिवादनही केलं. मात्र, साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजेंच्या (Shivendraraje) कार्यकर्त्यांनी डॉल्बी डीजे वाजवून संभाजीराजेंच्या बलिदान दिनी त्यांचा अवमान केल्याची टीका बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit bichukale) यांनी केली आहे. तसेच, मंत्री शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही बिचुकले यांनी केली आहे. विशेष म्हणजे बिचुकले यांनी आपल्या नव्या अवतारात येऊन शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन 29 मार्च रोजी होता, त्यादिवशी भाजप नेते आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या टुकार कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दणदणाट करुन गाण्याचे कार्यक्रम केले. 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानात दिवशी डॉल्बी लावून गाणे वाजवत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. मंत्री शिवेंद्रराजे यांचा वाढदिवस 30 मार्चला असतो, शिवेंद्रराजे तुम्ही राजघराणात जन्माला आला आहात, त्याची तुम्हाला किंमत आहे का? असा सवालच अभिजीत बिचकुले यांनी विचारला आहे. छत्रपती घराण्यात जन्माला येऊन तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचांचा अपमान करत आहात. त्यामुळे तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी आपल्या नव्या हेअरस्टाईलनेही माध्यमांचे लक्ष्य वेधले. तब्बल 25 वर्षानंतर बिचकुले यांनी आपले केसं कापून नवी हेअरस्टाईल केल्याचेही त्यांनी सांगितलं. 

25 वर्षानंतर आयकॉनिक हेअर स्टाईल बदलली

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे मोठे केस, रंगबिरंगी गॉगल आणि हटके स्टाईलवाला तरुण. आपल्या हटके स्टाईलमुळे बिचुकले महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर चर्चेत असतात. गेल्या 25 वर्षे लांबलचक केसांमध्ये पाहिलेल्या बिचुकले यांनी ता आपली हेअरस्टाईल बदलली आहे. दरम्यान, दोन्ही बिग बॉसमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण देशभर झाली होती. त्यामुळे, त्यांचा नवा लूकदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा

Video: बबन गितेचा 'द एन्ड' केल्याशिवाय चप्पल घालणार नाही, आ. सुरेश धसांनी सांगितला वाल्मिकचा प्रण