Pravin Darekar on Sandeep Deshpande : शिवतीर्थावर रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुढी पाडवा मेळाव्याचे  (MNS Gudi Padwa Melava) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणाआधी मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाषण केले. यावेळी संदीप देशपांडे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर कवितेतून आशिष झोलार म्हणत टीका जोरदार टीका केली होती. आता यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी संदीप देशपांडे यांना चांगलेच सुनावले आहे. 

Continues below advertisement

संदीप देशपांडे म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक राज ठाकरेंबाबत विचित्र पद्धतीने बोलत असतात. त्यांच्या साठी एक कविता केली आहे. लागली बत्ती पार्श्वभागाला की, येतो शिवतिर्थीवर चहा प्यायला. वांद्रेतून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. मुखवटा घालून फिरतो. मीच तुमचा मित्र खरा. पण कपटी मित्रापेत्रा दिलदार शत्रूच बरा. स्वत:ला समजतो. मुंबईचा मामा शेलार. पण सगळ्या मुंबईला माहिती आहे, हाच आहे मुंबईचा आशिष झोलार, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर कवितेतून केला.  

संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! 

यावर प्रवीण दरेकर म्हणाले की, मला वाटतं झोलार बोलण्याचे काम करत आहे. हे सोलारवर चालणारे आहेत.  विकासात्मक गोष्टींवर तुम्ही बोला. काही सूचना करा, व्यक्तिशः त्यात जायला नको.  झोलर कोण आणि खरे कोण? आ बैल मुझे मार, असं संदीपने करु नये, असे त्यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता प्रवीण दरेकर म्हणाले की, राऊतांनी नसती उठाठेव करु नये.  तुम्हाला वारसदार ठरवता आला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे आले. तरीही तुम्हाला लाजा वाटत नाही. उबाठाचा वारसदार आदित्य आहे की हळूच वरुण पुढे येतोय? राऊतांनी त्यासंदर्भात काळजी करु नये, असा पलटवार त्यांनी संजय राऊत यांच्यावर केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raj Thackeray : उठ मराठ्या जागा हो, तुमची फक्त माथी भडकावत आहेत, तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते; राज ठाकरेंनी 'महाराष्ट्र धर्मात' अंगार भरला!

Raj Thackeray Speech: छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला विक्की कौशल मेल्यावर कळलं? भर सभेत राज ठाकरेंचा थेट सवाल अन्...