Pravin Darekar on Uddhav Thackeray, Mumbai : "मी सगळं सहन करुन उभा राहिलोय, आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. लोकसभेला मोदी आले त्यामुळे गद्दाराचं कार्टे निवडून आले, असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झालाय. "विधानसभेला मोदीजींची गरज नाही, तुम्हाला फडणवीस शिंदे हेच पुरेसे आहेत", असं प्रत्युत्तर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिलं आहे. 


फडणवीसांना व्यक्तिगत धमकी उद्धव ठाकरेंनी दिली, भाजप धमक्यांना भीक घालत नाही


प्रवीण दरेकर म्हणाले, फडणवीसांना व्यक्तिगत धमकी उद्धव ठाकरेंनी दिली आहे. भाजप धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेबांचा वारसा सोडल्याचं यातून दिसून आलं. महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. मराठवाड्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक झाली, त्यावरून जनतेचं लक्ष विचलीत करण्यासाठी केलेलं विधान आहे. अपप्रवृत्तीचे देवेंद्र फडणवीस कर्दनकाळ आहेत. फडणवीस सर्वात लोकप्रिय नेते हे वारंवार सिद्ध झालंय. ठाकरेंनी सर्व परंपरा गुंडाळून ठेऊन नाक्यावर आणि बांधावर बोलावं तसं हमरीतुमरीचं विधान आहे.


नडलो तर नडलो पण स्वतः मात्र बेक्कार पडलो अशी ठाकरेंची स्थिती


पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, नडलो तर नडलो पण स्वतः मात्र बेक्कार पडलो अशी ठाकरेंची स्थिती आहे. पूर्वी किती खासदार होते आणि आता किती आहेत. अपयशात कर्तृत्व समजतय. मोदी कामातून जनतेला जिंकत आहेत. लोक विधानसभेत उत्तर देतील. उद्धव ठाकरे स्वतः गुर्मीत बोलतायत. उद्धव ठाकरेंना मुस्लिम आणि इतर मते मिळाली म्हणून काही जागा आल्या. विधानसभेला मोदीजींची गरज नाही, तुम्हाला फडणवीस शिंदे हेच पुरेसे आहेत. ज्या झाडाला फळ येतात त्यालाच लोक दगड मारतात, राज्यातील वांझोट्यांना कुणी दगड मारत नाही. वैफल्यातून ही भाषा आहे. 


फडणवीसांना जितके दगड माराल, तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल. हात उखडून फेकायची भाषा ते करतायत. त्यांनी कधी यापूर्वी असं काही केल्याचं ऐकिवात नाही. आमच्यासारखे बाळासाहेबांचे शिवसैनिक लोकांसाठी संघर्ष करायचो. अनिल देशमुख मुंबई पोलिस आयुक्तांना हाताशी धरून काय करत होतात. तू तरी राहशील किंवा मी राहील हे फडणवीसांनी कृतीतून दाखवून दिलंय, असंही प्रवीण दरेकर म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : परळी, कागल ते आंबेगाव, शरद पवारांनी 20 जागा हेरल्या, दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार!