Pratibha Dhaonorkar and Vijay Wadettiwar, चंद्रपूर : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दांडी आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तिकिटाच्या मुद्द्यावरून झालेला संघर्ष ताजा असताना सत्कार सोहळ्याला महत्व होते
सावली तालुक्यातील व्याहाड-खुर्द या गावी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांच्यासह वडेट्टीवार एकाच मंचावर येण्याची प्रतीक्षा होती. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात तिकिटाच्या मुद्द्यावरून झालेला संघर्ष ताजा असताना या सत्कार कार्यक्रमाला राजकीय महत्व होते. मात्र केवळ खा. किरसान यांची वडेट्टीवार यांच्यासह हजेरी, खा. प्रतिभा धानोरकर चंद्रपूर मुख्यालयी कार्यालयात आज होत्या हजर मात्र त्यानी वडेट्टीवार यांच्यासह एका मंचावर येणे टाळले.
लेकीसाठी विजय वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बाजी प्रतिभा धानोरकरांनी मारली, अन् विजयश्री खेचून आणली
महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या (Chandrapur Lok Sabha Constituency) जागेवरून देखील रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शेवटी दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवारांची (Vijay Wadettiwar) कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) देखील इच्छुक होत्या. तर, लेकीच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. थेट दिल्ली वारी करून त्यांनी मुलीच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. पण शेवटी उमेदवारी मिळवण्यात प्रतिभा धानोरकरांनी बाजी मारली आणि सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar : कांदा निर्यात बंदीची मोठी किंमत मोजावी लागली, काहीही करा, पण निर्यात बंदी करु नका,अजितदादांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी