Prasad Lad on Manoj Jarange, मुंबई : "तुम्ही पर्वा दरेकरांना म्हणालात घरात घुसू, पंखे तोडू. तुमच्यात हिंमत असेल तर मुंबईत या. हे सगळे उद्योग आणि धंदे बंद करा. देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) मुका आम्ही घेऊ, पण तुम्ही शरद पवारांचा मुका घ्यायचं बंद करा. मराठा आंदोलनाचं राजकारण करुन त्याला खड्ड्यात घालण्याचं काम करु नका" असं म्हणत भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आव्हान दिलंय. ते मुंबईत बोलत होते.
आम्ही ज्या भागात लहानाचे मोठे झालो ते हे धंदे करुनच मोठे झालो
प्रसाद लाड म्हणाले, एखाद्या व्यक्तीमत्वाचं किंवा आंदोलनाचं सन्मान किती करायचा याची एक वेळ असते, एक सन्मान असतो. परंतु वेळोवेळी एखाद्या गोष्टीचं राजकारण करुन समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचं काम मनोज जरांगे पाटील करणार असतील. देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्या, त्यांना जे करायचंय ते करा. मी बघून घेईल, असं म्हणतात. मनोज जी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आम्ही ज्या भागात लहानाचे मोठे झालो ते हे धंदे करुनच मोठे झालो, असंही प्रसाद लाड यांनी सांगितलं.
हिंमत असेल तर राजकारणात या, राजकारणातले संविधानाचे प्रश्न सोडवा
पुढे बोलताना प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले, मी तुम्हाला स्पष्टपणे, प्रामाणिकपणाने आणि प्रेमाने सांगितलं होतं. हिंमत असेल तर राजकारणात या. राजकारणातले संविधानाचे प्रश्न सोडवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचे प्रश्न सोडवा. तुम्ही जर खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणार असाल तर आम्ही सौम्य पणाने उत्तर देतोय. याच्या पुढचे उत्तर तुमच्या उत्तरापेक्षा घाणेरडं असेल. हे डोक्यात ठेवा आणि लक्षात ठेवा, असंही लाड म्हणाले.
मनोज जरांगे काय काय म्हणाले होते?
सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय द्यायचा नाही ठरवलं आहे. त्यामुळे गोरगरिबांनी ठरवलं आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. 20 तारखे पर्यंत चित्र बदललेले दिसत, देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार आहे. मला हलक्यात घेऊ नका, मी एकदा राजकारणात घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Baramati Vidhan Sabha: अजितदादांकडून स्पष्ट संकेत; बारामती विधानसभेत आता जय पवार Vs युगेंद्र पवारांची लढाई रंगणार?