Akola News : राज्यात प्रकाश आंबेडकर नेमकं कुणासोबत जाणार यावर सध्या मोठा सस्पेन्स आहे. एकीकडे मुंबई आणि नागपुरात आंबेडकर काँग्रेसशी आघाडी करणार असल्याच्या चर्चा आहे. तर आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) राज्यात 12 ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि 10 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडीची चर्चा सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी एक सुचक आणि महत्वाचं विधान केलंय.

Continues below advertisement

नवरदेव तयार आहे. मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. नुसतं चहापाण्याच्या चर्चा आहेत. मुलगी पसंद आल्यानंतर लगीन लावू, असं म्हणत त्यांनी अद्याप कुणाशीही युती-आघाडी झाली नसल्याचं स्पष्ट केलंय.

Prakash Ambedkar : 50 टक्के जागा वाटपांवर आम्ही ठाम, मुंबईत 200 जागांवर आमची तयारी

Continues below advertisement

दरम्यान, आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही, असं ते म्हणालेत. तर मुंबईचं सांगता येत नाहीये. कारण, आघाडी जाहीर करा म्हणलं तर थांबा म्हणतात. आज काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र जात नाहीये. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायचा आहे कुणासोबत जायचं. काँग्रेससोबत मुंबईत अद्याप जागा वाटपावर बोलणी सुरू झाली नाही. मात्र, 50 टक्के जागा वाटपांवर आम्ही ठाम असल्याचं ते म्हणालेय. कारण, आम्ही नगरपालिकेत काय आहो, ते दिसलोय. दुसरीकडे आम्ही मुंबई 200 जागांवर आमची तयारी आहे, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. आमचा आग्रह 50-50 टक्के जागांचा असल्याचंही ते म्हणालेय.

Prakash Ambedkar : 350 कोटींचा निधी अजित पवारांनी बारामतीला पळवला, भाजपचे माजी खासदार संजय धोत्रेंवर मोठा आरोप

दरम्यान, अकोल्यातील भूमिगत गटार योजनेच्या फेल्युअरला माजी खासदार संजय धोत्रे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ही योजना नको म्हणून संजय धोत्रेंनी केंद्राला पत्र लिहिलं होतं. त्यावेळी महापालिकेला आलेला 350 कोटींचा निधी अजित पवारांनी बारामतीला पळवल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यावेळी अजित पवारांनी मला फोन करून सांगितलं, बारामतीकडं पैसे वळवले. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांचा संजय धोत्रेंवर मोठा आरोप केल्याने भाजप यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

Akola News : 'वंचितच्या तिकीट इच्छुकांनी केली प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी गर्दी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज  अकोल्यात आहेत. महापालिकेच्या तिकीट इच्छुकांनी प्रकाश आंबेडकरांच्या कृषीनगरमधील 'यशवंत भवन' या घरी आज मोठी गर्दी केलीय. या सर्वांनी तिकिटासाठी प्रकाश आंबेडकरांना गळ घातलीय. अकोला महापालिकेत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचे तयारीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इच्छूकांनी प्रकाश आंबेडकरांना भेटण्यासाठी गर्दी केलीय. याआधी 80 जागांसाठी जवळपास 200च्या वर लोकांनी पक्षाकडे मुलाखती दिल्यायेत. शहरातील मुस्लिम आणि दलित बहुल भागात वंचितच्या तिकिटासाठी मोठी स्पर्धा आहेय.

संबंधित बातमी: