Prakash Ambedkar VBA First List :  वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी  अखेर आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. त्याशिवाय, सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटले. आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी 7 उमेदवारांची घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटालाही धक्का दिला आहे.  सांगलीमध्ये वंचितने ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. 


प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र, आता ही बोलणी फिस्कटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश  आंबेडकर यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली.


प्रकाश आंबेडकरांनी एकूण 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच, मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत 30 एप्रिलनंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलं. 


प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? 


वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, "काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत.  काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. 


मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे. आमचे जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील.  पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्याशिवाय वंचितने नागपूर मधून काँग्रेस आणि सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. 


वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील उमेदवार 


चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळूंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार
नागपूर : काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
सांगली: प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार


इतर संबंधित बातमी :