Prakash Ambedkar on Sushilkumar Shinde, Solapur : "सोलापूरच्या निवडणुकीत मुस्लिम मतदार निर्णायक असतील. तुम्ही निर्णय करणार आहात की, भाजपाला जिंकून द्यायचे की हरवायचे आहे. मौलवी लोकं आज काँग्रेस काँग्रेस का करत आहेत. त्यांना विचारा की देशाभरात एक ही मुस्लिम उमेदवार का दिला नाही? भाजपची लाईन आहे त्याचं लाईनवर काँग्रेस जात आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडणूक नंतर परिवारासह भाजपामध्ये जाईल", असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) म्हणाले. ते सोलापुरातील सभेत बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जातील, असं भाकितही केलं. 


मागच्या वेळी तुम्ही चूक केली


प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेला म्हणालो सेक्युलर मतांवर निवडून येणारं आहोत. सोलापुरातल्या मुस्लिम समजला आवाहन आहे, मागच्या वेळी तुम्ही चूक केली. मौलवी लोकांचं ऐकलंत, मौलवी लोकं चांगली आहेत पण त्यांना मुस्लिम सोडून बाहेर काय चाललं हे माहिती नाही. म्हणून त्यांचा एकच नारा काँग्रेस असा असतो, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. 


पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ऑल इंडिया मुस्लिम फेडरेशनने सांगितलं की, जो भाजपला हरवेल त्याला मत टाका. काँग्रेसची मतं किती आहेत तुम्ही बघितलं, सुशीलकुमार यांच्या मतांमध्ये वाढ होणार नाही. मुस्लिम बांधव जर तिथेच चिटकून राहिले तर तुमच्यामुळे इथे भाजप निवडून येईल. मौलविंना आवाहन आहे की,  तुम्ही मुस्लिम समुदायाच्या बाहेर पडा, त्यांना निर्णय द्यायचा असेल तर दुसऱ्या समुदायत जाऊन बसा. 


जे कपडे घालायचे ते घालू द्या


आज भाजप संविधान बदलण्याचे प्रयत्न करतय. हिजाब प्रकरणात आमची भूमिका अशी आहे की,  की ज्याला जे कपडे घालायचे ते घालू द्या. आता कर्नाटकत तोच मुद्दा पुढे आलाय, काँग्रेसची भूमिका काय तिथे पाहा.  जी भूमिका भाजपची होती तीच भूमिका काँग्रेसची आहे. औरंगजेबचा मुद्दा जेव्हा आला, मुलं स्टेट्स ठेवत होती, त्यांना अटक होताना काँग्रेस कुठं होती? असा सवाल आंबेडकर यांनी केलाय. 


तर गल्लीगल्लीत पुन्हा गोदरा आणि मणिपूर होईल


बहुजन आघाडी होती ज्यांनी औरंगजेबच्या कबरावर जाऊन चादर चढवली आणि सांगितलं आमच्यावर गुन्हा दाखल करून दाखवा. मुस्लिमांनो आता जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला वाचवायला कोणी येणारं नाही. जर या सरकारला पुन्हा आणलं तर गल्लीगल्लीत पुन्हा गोदरा आणि मणिपूर होईल.  जर झालं तर तेव्हा काय काँग्रेस येणारं का? गोदरामध्ये तर काँग्रेस सहभागी होतं असं समोर आलं, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Jayant Patil on Vishwajeet Kadam : स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा चालणार नाही, जयंत पाटलांच्या विश्वजीत कदमांना कोपरखळ्या