शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला. उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत झालेला निर्णय प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर सांगितला. "शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं. असा ठराव आम्ही आज पारित केला आहे. आम्ही हा ठराव घेऊन पवारांना भेटायचा प्रयत्न करू. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येतं असून तेच पक्षाचे अध्यक्ष राहावेत", असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?
2 मेच्या दिवशी शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी पक्षाचा अध्यक्ष पदावर दुसऱ्याने राहावं अशी सूचना केली होती. समिती देखील गठित केली होती. मी पक्षचा उपाध्यक्ष असल्यामुळे मला त्याची जबाबदारी दिली होती.
Praful Parel PC LIVE | प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद