पुणे : दहशतवाद्यांना (Terrorist) घरात घुसून मारणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. 10 वर्षांआधी भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे, मुंबईत दहशतवादी हल्ले व्हायचे, काशीमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झालंय की नाही. जे इथे शेजारून (पाकिस्तान) स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणं कठीण झालं आहे. पीएफआयवर प्रतिबंध लावला, असंही मोदींनी यावेळी सांगितलं. ते पुण्यातील प्रचारसभेत बोलत होते. 


दहशतवाद्यांना घरात घुसून मारणार


देशात कधीच धर्मांच्या आधारावर आरक्षण लागू होऊ शकत नाही. धर्माच्या आधारे आरक्षण देऊन देशाचे विभाजन करण्याचे काम भारत आघाडी करत आहे. पण मोदी अजूनही जिवंत आहेत. मोदी हे होऊ देणार नाहीत. काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवादाला चालना मिळाली. मुंबई आणि पुण्यात रक्तस्त्राव झाला होता. मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे, काशीत व्हायचे. पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं आहे.


दहशतवादी पाठवायचे त्यांना आता अन्न मिळणं कठीण


10 वर्षांआधी भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे, मुंबईत दहशतवादी हल्ले व्हायचे, काशीमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झालंय की नाही. जे इथे शेजारून (पाकिस्तान) स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणं कठीण झालं आहे. हा मोदी आहे, घरात घुसून मारेल, अशा कडक शब्दात मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिला आहे.


सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न


मला फक्त दहा वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. समाजातील सर्व घटकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला.  यावेळीच्या बजेटमधे एक लाख कोटी रुपये इनोव्हेशनसाठी दिलेत.  पुण्याला याचा फायदा होईल. आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचारचा टॅक्स वसूल केला, असं म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.


काँग्रेसने 10 वर्षात विकासावर खर्च केला, तेवढा आम्ही एका वर्षात केला


मनमोहन सिंह यांच्या सरकारने 10 वर्षात मुलभूत विकासावर जेवढा खर्च केला, तेवढा आम्ही एका वर्षात केला, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. स्टार्टअप इंडियाची कमाल पाहा, फक्त 10 वर्षात सव्वा लाखाहून अधिक स्टार्टअप तयार झाले आहेत. गर्वाची गोष्ट म्हणजे यातील अनेक स्टार्टअप पुण्यात आहेत. आम्ही नीतीगत बदल केले आहेत. एक लाख कोटी रुपये इनोव्हेशन करण्यासाठी देण्याचा निर्णय अंतरिम अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


पुण्यात येऊन मोदींचा पवारांवर पहिला हल्ला, एका नेत्यामुळे राज्य अस्थिर, भटकत्या आत्म्याने स्वत:चा पक्षही अस्थिर केला!