नवी दिल्ली : राजकीय गोटातून सर्वात मोठी बातमी... अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादील (NCP) मंत्रिपद मिळणार नसल्याची सध्या चर्चा सुरू आहे.. यासंदर्भात सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkar) निवासस्थानी बैठक झाली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहचलेत. दरम्यान काही वेळापूर्वी मंत्रिपदासाठी अद्याप फोन आला नसल्याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) एबीपी माझाला दिली. यानंतर आता फडणवीस तटकरेंच्या घरी पोहचलेत त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत सुनील तटकरेंच्या घरी बैठक सुरू आहे. या बैठकीला पफुल पटेल देखील पोहचले आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्री पद मिळालेले नाही. प्रफुल पटेल यांचे नाव मंत्रिपदासाठी नाव आघाडीवर होते.त्यांना फोन येईल अशी अपेक्षा होती, परंतु दुपारी 12 पर्यंत पटेलांना फोन आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही, असे स्पष्ट होत आहे. त्यात देवेंद्र फडणवीस देखील सुनील तटकरेंच्य निवासस्थानी पोहचले आहेत.त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अचानक फडणवीस तटकरेंच्या घरी दाखल
पंतप्रधानांच्या निवासस्थानी सर्वांनी निमंत्रीत करण्यात आले आहे. राष्ट्रवादीला आतापर्यंत फोन येणे अपेक्षीत आहे. मात्र फोन न आल्याने मंत्रीपद मिळणार नाही, हे स्पष्ट होत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे तटकरेंच्या घरी पोहचले आहेत. त्यामुळे ते काही करतात की हे पाहणे महत्त्वचे ठरणार आहेत. कारण ते अचानक फडणवीस तटकरेंच्या घरी दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळात विस्तारात जातीय गणितं आणि राज्यांतील विविध प्रांत यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
7.15 ला शपथविधी आहे तोपर्यंत वाट पाहायला हरकत नाही : अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, मंत्रिमंडळात कोण शपथ घेणार हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. संध्याकाळी 7.15 ला शपथविधी आहे तोपर्यंत वाट पाहायला हरकत नाही.. याबाबत अधिक माहिती अजित पवार देतील. मात्र कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास आहे. संध्याकाळी 7.15 ला शपथविधी आहे. तोपर्यंत फोन आला तर आम्हाला आनंदच आहेत. अजून सात तास वेळ आहे. तोपर्यंत काही घडामोडी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातून पाच जणांना मंत्रिपदासाठी फोन
महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.
हे ही वाचा :