Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर हळूहळू सर्वच पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. अशात लोकसभा जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. परभणी (Parbhani) लोकसभा भाजपचं लढवणार, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. परभणी लोकसभा (Parbhani Lok Sabha Constituency) भाजपचं लढवणार, असा दावा भाजप लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर (Ramprasad Bordikar) यांनी केला आहे. लोकसभेतील 6 पैकी 3 विधानसभा भाजपच्या आहेत, असं म्हणत भाजप लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर यांनी परभणी लोकसभेवर दावा केला आहे.


लोकसभा जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच


परभणी लोकसभा मतदारसंघ हा हिंदुत्वाचा मतदारसंघ असून या मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा येतात या सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत उर्वरित 3 विधानसभेतही भाजपची ताकत मोठी आहे यामुळे ही जागा आम्हीच लढवणार असा दावा भाजपचे परभणी लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर यांनी केला आहे.


परभणी लोकसभेवर बोर्डीकरांचा दावा


परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर तसेच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडूनही दावा केला जात आहे. मात्र, हा दावा करण्यात आला असतानाही भाजपकडून या लोकसभेतील सत्ता स्थान लक्षात घेता, ही जागा आम्ही आम्हाला सोडून घेणार आणि आमचा कमळावरीलच उमेदवार इथं असणार, असं भाजपचे लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे परभणी लोकसभेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.


लोकसभा निवडणुकीत मराठा समाज सरकारला घेरणार 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याची रणनिती आखली जात आहे. शिवाय, फक्त मराठा समाजातीलच नाही तर इतर समाजातील उमेदवारही निवडणुकीत उभे केले जाणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महायुती सरकार गंभीर नाही, असे म्हणत बैठकांमध्ये सरकारला घेरण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. 


परभणी लोकसभेचं गणित बदललं


परभणी लोकसभेचं गणितही यामुळे बदललं आहे. उद्धव ठाकरेंच्या कठीण काळात साथ देत पक्षांतराच्या शापातून मुक्त केलेल्या परभणी लोकसभेत (Parbhani Lok Sabha) यंदाही विद्यमान खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) हेच शिवसेनेचे उमेदवार असतील, हे सध्या निश्चित झालं आहे. त्यामुळे ते लोकसभेतील 40 वर्षाचा गड यंदाही शाबूत ठेवणार का? असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे. तर महायुतीतील 3 पक्षांपैकी कोणता पक्ष जागा मिळवून संजय जाधव यांचा विजय रथ रोखतो? याकडे पूर्ण लोकसभा मतदार संघाचं लक्ष लागलं आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


संजय जाधव, विटेकर, बोर्डीकर इच्छुकांची यादी काही संपेना; परभणी मतदार संघावर कोण वर्चस्व गाजवणार?