पुणे : यंदाच्या उन्हाळ्यात पाणीकपात होऊ नये म्हणून पुणे जिल्ह्यातील पहिला टँकर पुरंदरमध्ये सुरू झाला आहे. यंदा पुरेसा पाणीसाठा आहे असे सरकारने सांगितले आहे. प्रशासनाने व्यवस्थित पाणी वाटप करावे, अशी आमची मागणी आहे. संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात मी रिव्ह्यू घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाण्याच्या बाबतीत आपण सेफ आहोत, असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी म्हटले. पुरंदर येथेल पाणी टँकर उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. दरम्यान, यावेळी बीडमधील घटना आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरूनही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. तसेच, बीडमधील सरपंच हत्याप्रकरणात धनजंय मुंडेंना सहआरोपी करा, अशी मागणी देखील खासदार सुळे यांनी केली आहे. वाल्मिक कराडचे आणि धनंजय मुंडे यांचे नाते किती घट्ट आहे हे कळतं. त्यामुळे, त्यांना देखील सहआरोपी करा अशी आमची मागणी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. दरम्यान, यापूर्वीच शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.   

बीडमध्ये जे खून झाले आहेत, त्यांची फाईल पुन्हा उघडली पाहिजे, अशी मागणी मी कालच मुख्यमंत्र्‍यांकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केले त्याचा मी जाहीर निषेध केला आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा न पण वापरला नाही, त्यांच्या पक्षात काय चाललं आहे, हे त्यांनाच माहीत असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले होते, त्यावरुन सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केलाय. तसेच  

सुरेश धस याचे स्टेटमेंट आहे, नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची भेटच झाली नाही, हे दुर्दैव आहे. वाल्मिक कराडचे पीए धनंजय मुंडेंना भेटायला गेले आहेत. त्यावरुन कळत की हे नाते किती घट्ट आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी आमची मागणी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तर, पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबाची माफी मागितली आहे, त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवला असे म्हणत पंकजा मुंडेंच्या भूमिकेचं स्वागत देखील केलं. खंडणी झाली, खून, हिंसाचार, शेतकरी यांची फसवणूक अजून काही राहिले का? कुठला गुन्हा  राहिला आहे. ज्यावेळी हा प्रकार झाला त्याला व्हिआयपी ट्रीटमेंट झाली, या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय, असेही सुळे यांनी म्हटले. 

राजीनामा यायला 84 दिवस का लागला?

जी बातमी सोशल मीडियावर आली आहे, मला त्याची माहिती काढू देत. ज्या काही गोष्टी आल्यात त्या भयंकर आहेत. विश्वासाच्या नात्याने लोकांनी सत्ता दिली. पण, कुठलाच गुन्हा सोडला नाही त्यांनी. 84 दिवस झाले कालचा राजीनामा यायला, हे व्हिडीओ मधले फोटो आहेत. पीडित कुटुंबातील लोकांना काय वाटत असेल. अखेर स्वतःची नैतिकता महत्त्वाची असते, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले. 

हेही वाचा

बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात