Pankaja Munde: राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात. कशातही आपलं नाव ओढतात, असं म्हणत पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातील टीका-टिप्पणीवर खंत व्यक्त केलीय. जालना येथे शिवसेनेच्यावतीने पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. 

दरम्यान स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढताना पंकजा मुंडे यांनी, जात नाही ती जात...पण आम्ही जातीयवादी नाही. जात म्हणजे समाज आणि हाच समाज ज्या हातात द्यायचा ते हात तयार झाल्याचे लक्षात येताच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचं बोलून दाखवल्याचं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

आता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः विषय अजून तसा धनंजय मुंडेंकडे केला नाही. स्वतः अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे , यात संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू...संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, हा अजित दादांचा निर्णय आहे, असं पंकजा मुंडेंनी सांगितले. तसेच  तपास यंत्रणा त्यांना काळजी घेतील त्यावरच हे सगळं अवलंबून आहे. आपल्याला त्याच्याबद्दल ग्रहण माहिती नाही, असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. 

आगामी काळात मंजूर करण्यात येणाऱ्या विकासकामांच्याबाबत पंकजा मुंडेंनी घेतली माहिती-

जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी निमित्त 1 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे उपस्थित राहिले. या बैठकीमध्ये जालना जिल्ह्यातील सर्व विकासकामांचा आढावा घेतला. रखडलेली विकासकामे तसेच आगामी काळात मंजूर करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या बाबत माहिती घेतली. यावेळी अधिकारी वर्गानं सादर केलेले विविध विषय समजून घेतले. जिल्हा पातळीवरील नागरी समस्या, सुरक्षा आणि इतर विविध मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

संबंधित बातमी:

Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर