Naresh Mhaske on Sanjay Raut : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर मोठा दहशतवादी हल्ला ( Pahalgam terror attack) झाला आहे. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) 6 जणांचा समावेश आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. अरे गांजावाल्या... तुला थोडी लाज वाटते का? अशा शब्दात म्हस्के यांनी राऊतांची समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के?
दहशतवादी हल्ला आपल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांवर झालाय. त्या भ्याड दहशतवाद्यांनी निरागस, निष्पाप लोकांना वेठीस धरले. धर्म विचारुन गोळ्या घातल्यात रे, तू त्याच्यावर राजकारण करतोस???? शरम वाटली पाहिजे तुला.... हा देशावरचा हल्ला आहे. कुठेतरी ओकायचं थांब...?? वेळ प्रसंग बघून तरी ओकत जा अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
तुझ्याकडून सल्ला घेण्या इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आलेली नाही
तुझ्या ओकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणा सरकार यांना काही फरक पडणार नाही... ते त्यांचं कर्तव्य परमनिष्ठेने करतात, करतील... आणि तुझ्याकडून सल्ला घेण्या इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आलेली नाही. कोविड सारख्या जागतिक संकटातही स्वतःच्या तुंबड्या भरणारे तुमच्यासारखे लांडगे केंद्रात बसलेले नाहीत... तू तुझे भोंगे तुझ्या डबक्यात वाजवत राहा... राष्ट्रीय सुरक्षा वगैरे तुझ्या आवाक्यातले विषय नाहीत अशी टीका म्हस्के यांनी राऊतांवर केली.
अमित शाह हे आजवरचे सगळ्यात सक्षम गृहमंत्री
अमित शाह हे आजवरचे सगळ्यात सक्षम आणि निर्णायक भूमिका घेणारे गृहमंत्री असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले. आपली पोहोच मागच्या दाराने येण्याची आहे, असा टोला म्हस्के यांनी राऊतांना लगावला. त्यामुळं त्यांच्या भानगडीत पडू नको. काँग्रेसची आणि देशद्रोह्यांची दलाली करत रहा अशी टीका म्हस्के यांनी केली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: