Shivsena Opration Tiger: शिवसेनेचे ॲापरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) यशस्वी झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदार आज राजकीय अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. त्याआधी ठाकरेंचे फुटलेले 4 खासदार आज मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. (Shivsena MP Opration Tiger)
संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर आज दुपारी 1.30 वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले. यानंतर आपल्या खाजगी वाहनाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील निवासस्थान नंदनवनच्या दिशेने निघाले आहेत. ओमराजे निंबाळकर धाराशीवमधून मुंबईच्या दिशेने पोहचतील. तर संजय दिना पाटील मुंबईतच असल्याने ते देखील थोड्याच वेळेत नंदनवन येथे पोहोचतील अशी माहिती आहे. (Shivsena MP Opration Tiger)
ठाकरेंच्या फुटीर खासदारांचं विमान मुंबईत दाखल होताच संजय राऊतांचं लगेच ट्विट- (Shivsena MP Opration Tiger)
ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत दाखल होताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर ट्विट करत हल्लाबोल केला आहे. 50-50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलीसांच्या गराड्यात बाहेर पडले. ये जिना भी क्या जिना है लल्लू?...चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे. यांची पुढील पिढी सांगेल, मेरा बाप गद्दार था...मेरा पती गद्दार था...मेरा नाना गद्दार था...जय महाराष्ट्र...असं म्हणत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.
ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे- (Shivsena MP List)
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
कोणते खासदार शिंदे गटात गेले? (Opration Tiger Shivsena MP)
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
'ऑपरेशन टायगर'ची टाईमलाइन- (Shivsena Opration Tiger)
- 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
- अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
- 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
- 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
- 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
- अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
- नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित
- ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर
- 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट
- 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
- फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
- 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद
- ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र
- ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप
