धाराशिव: राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बार्शी येथील सभेत 'माझा बाप मारला,माझा बाप मारला', म्हातारा झाला तरी मडपीक 15 वर्षे घेणार का अशी जोरदार टीका केली होती. त्यावर ओमराजे निंबाळकर (omraje nimbalkar) यांनी आक्रमक होत तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ओमराजे यांनी भरसभेत 'खेकडामंञी' असा उल्लेख करत 'बायलर कोंबडी' 'अंडा' आणि 'जर्सी गाय' अशी उदाहरणे देत ओमराजेंनी तानाजी सावंत यांच्यावर आगपाखड केली. 


मी माझ्या आजपर्यंतच्या निवडणुकीच्या भाषणात एकदाही स्व.पवनराजे यांच्या हत्येचा विषय काढला नाही. उलट पवनराजे ह्यात असते तर ओमराजे बघायला ही भेटला नसता, इंजिनिअरिंग करुन तिकडच बसला असता. बरं माझ्या वडीलांची हत्या झाली हे काय खोटं आहे का?त्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वत: तिकडे आहेत. खेकडामंत्री यांना माझं जाहीर आवाहन आहे की, पवनराजे यांच्या हत्येचे प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्ही गृहमंत्री आहात. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण द्या एका महीन्यात निकाल लावा, तुमच्या हातात आहे. पण निकाल का देत नाही कारण त्यांना माहीती आहे की, दोषी सापडणार आहे. मात्र 2006 पासून 2024 आजपर्यंत केवळ प्रकरण वाढवायचं काम सुरु असल्याचे  ओमराजे निंबाळकर म्हणाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत स्व.पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा विषय पुन्हा एखदा चर्चेत आला आहे. 


तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते?


धाराशिवमधील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी नुकतीच बार्शी येते सभा झाली होती. या प्रचारसभेत तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला चढवला होता. ओमराजे निंबाळकर यांनी एक रूपयांचा विकास केला ना कुणाला एक रुपयांची मदत केली. 2009 पासून आजपर्यंत त्यांच्या ( ओमराजे निंबाळकर ) भाषणाची सुरूवात माझा बाप मारला, माझा बाप मारला, अशी होते. अरं काय लावलंय हे? भावनेच्या आहारी जाऊन 2009 मध्ये जनतेनं एकदा आमदार केलं. त्याच जनतेनं 2014 मध्ये घरी बसवलं. एक रूपयाचा विकास केला ना एक रूपयांची कुणाला मदत केली. भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही. धाराशिवमध्ये फक्त विकासाची भाषा चालते, असे तानाजी सावंत यांनी म्हटले होते.


आणखी वाचा


ओमराजे निंबाळकर 100 बापाचा, त्याच्या तिकीटासाठी उद्धव ठाकरेंना 10 कोटी दिले, निवडून आणलं; शिंदेंचे मंत्री तानाजी सावंत यांनी टीकेची पातळी सोडली