Deepak Kedar on Lakshaman Hake: ओबीसींना आंबेडकर नावाचं नेतृत्व चालत नाही असं म्हणत ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जर बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) काढत असतील तर लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यात का सहभागी होत नाहीत असा सवाल दलित पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी केलाय. ओबीसी आरक्षणासाठी सध्या लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण जनआक्रोश यात्रा काढली आहे. या यात्रेवर आक्षेप घेत दीपक केदार यांनी हाकेंसह इतर ओबीसी नेत्यांवर निशाणा साधलाय. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बाळासाहेब आंबेडकर काढणार आहेत. त्यात ओबीसी नेत्यांनी सहभागी व्हावे असे पत्र सुद्धा पाठवण्यात आल्याचे दलित पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी बीडमधून सांगितले.
भाजपच्या इशाऱ्यावर मोर्चा आंदोलने काढतात
बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली म्हटल्यावर सगळं ओबीसी नेतात सामील व्हायला हवं होतं. भाजपच्या इशाऱ्यावर मोर्चा काढणारे लक्ष्मण हाके, छगन भुजबळ भाजपच्या इशाऱ्यावर मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी मोर्चा आणि आंदोलने काढत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय.
त्यांची भूमीका जातीयवादी- दीपक केदार
मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह छगन भुजबळांसह इतर नेते मोर्चे, आंदोलने करतात असा आरोप करत दीपक केदार यांनी लक्ष्मण हाकेंवर जोरदार निशाणा साधलाय. जर बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे तर लक्ष्मण हाके यांना ओबीसी आरक्षण जनआक्रोश यात्रा काढण्याची गरजच काय? असा सवाल दलित पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी हाके यांनी केला आहे. त्यामुळे हे उघड आहे की ओबीसी जात असणाऱ्या नेत्यांना आंबेडकर आडनावाचे नेतृत्व चालत नाही. त्यामुळे त्यांना कितीही निमंत्रण दिली तरी ते या आंदोलनात सहभागी होणार नाहीत. भाजप सांगेल तेच हे करणारे नेते आहेत. आमदारकी खासदारकीसाठी आरक्षण वाचवायच्या लढायला अधिक महत्त्व दिले पाहिजे असं आवाहन करत बाळासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या यात्रेत पक्ष सोडून सहभागी व्हायला हवं. पण ते असं करणार नाहीत कारण त्यांची भूमिका जातीयवादी आहे असा आरोप दीपक केदार यांनी केला आहे.
जरांगेंवर नवनाथ वाघमारेंनी साधला निशाणा
दरम्यान ओबीसी आरक्षण आंदोलन लक्ष्मण हाके यांचे साथीदार नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर कडाडून टीका केलीय.जरांगे नावाच्या बांडगुळाने राज्यात हैदोस घालण्याचं काम केलं हॉटेल आणि ओबीसी नेत्यांच्या गाड्या जाळण्याचे काम केलं, असल्याची आरोप नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर केलाय.
जरांगेच्या अनेक आंदोलन सुरू झाली प्रशासन आणि सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम केलं असल्याचंही नवनाथ वाघमारे म्हणाले असून कोणाचेही गुन्हे मागे घेतले नाही पाहिजेत. सरकार जरंगेचे लाड करत असल्याचा ठपका ठेवत वाघमारे यांनी सरकारला घेरले.
हेही वाचा: