Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेग आलाय. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा माणूस असल्याची दावा विरोधी पक्ष करत असल्याने त्यांच्या राजिनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ आता ओबीसी नेते देखील उतरताना दिसून येत आहेत. सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ आता ओबीसी नेते देखील उतरताना दिसून येत आहेत.संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही अतिशय दुर्दैवी आहे या हत्येचा मी जाहीर निषेध करतो या प्रकरणातील आरोपीला कठोर शासन करावे त्याला फाशीही द्यावी. मात्र संतोष देशमुख यांच्या आडून जे काही चाललं आहे. हे हत्या प्रकरण बाजूला ठेवून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ओबीसीच्या नेत्याला टार्गेट केल जात आहे. धनंजय मुंडे,पंकजा मुंडे यांचे जाणीवपूर्वक राजीनामे मागितले जात आहेत. म्हणून मी त्यांच्या पाठीशी पालक म्हणून खंबीरपणे उभा राहत आहे. यामध्ये जाणीवपूर्वक एका जातीला ओबीसी समाजाला बदनाम करणं चुकीचे असल्याचे ओबीसी नेते प्रा.टीपी मुंडे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस हे सध्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतायत.जिल्हाधिकारी पाठक हे जवळपास एक महिना प्रशिक्षणासाठी गेले होते.त्यानंतर ते आजच रुजू झालेत. जिल्हाधिकारी रुजू झाल्यानंतर आमदार सुरेश धस भेटीसाठी पोहोचले आहेत.
बीडमधील वातावरण तापलं
बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर चार वेगवेगळे आंदोलनं, उपोषणं सुरु आहेत.आज वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या यासाठी देखील एका महिलेने आंदोलन सुरू केलय. 3 दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी उपोषण केले जातेय. तिसरे आंदोलन शहरातील शस्त्र परवाने तपासून रद्द करण्यासाठी अंजली दमानिया आंदोलन करत आहेत.
अखेर, सीआयडीच्या तपासाचा वेग
बीड जिल्ह्यात 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी सर्वच नेत्यांनी केली. त्यासह, वाल्मिक कराडच या घटनेतील मुख्य सुत्रधार असून त्यालाही अटक करण्याची मागणी आमदार, खासदार व स्थानिक नेत्यांनी केली. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारेन, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय. तर, धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचंही नेत्यांनी म्हटलं होतं. अखेर, सीआयडीच्या तपासाचा वेग, पोलिस यंत्रणा व सरकावर वाढत असलेला राजकीय, सामाजिक दबाव लक्षात घेत आता वाल्मिक कराड शरण येत असल्याची माहिती आहे.