नवी दिल्ली : देशात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार बनण्याची तयारी सुरू आहे. एनडीएच्या बैठकीमध्ये (NDA Meeting) संयुक्त जनता दलचे नितीश कुमार (Nitish Kumar) आणि तेलगु देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी समर्थन पत्र दिलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली एनडीए आता राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आणि बहुमताचा आकडा पार केला. दुसरीकडे विरोधी पक्ष इंडिया आघाडील 234 जागा मिळाल्या आहेत. एनडीएमध्ये 240 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण स्वबळावर सरकार स्थापन करता येईल इतकं संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे एनडीएच्या नेतृत्वाखाली आता मोदींना सत्ता स्थापन करावी लागणार आहे.
दुसरीकडे काँग्रेस 99 जागांसह इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. तर समाजवादी पक्षाला 37 तर टीएमसीला 29 जागा मिळाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएल 292 आणि इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या. त्यानंतर नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या. पण या दोघांनी कोणतीही वेगळी भूमिका न घेता एनडीएला समर्थन दिल्याचं जाहीर केलं.
एनडीएचे गणित
NDA आघाडीत नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपी यांचा समावेश आहे. एनडीएला निवडणुकीत 292 जागा मिळाल्या आहेत. 272 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा त्या 20 जागा जास्त आहेत. म्हणजेच एनडीएने सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे.
एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने एकट्याने 240 जागा मिळवल्या आहेत. पण स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना 32 खासदारांची कमी आहेत. चंद्राबाबू नायडू (16 जागा), एकनाथ शिंदे (7 जागा) आणि नितीशकुमार (12 जागा) या एनडीए आघाडीतील तीन मित्रपक्षांच्या जागा मिळवल्या तर ही उणीव भरून निघते.
अपक्ष आणि छोटे पक्ष
यावेळी 7 अपक्ष आणि 11 छोट्या पक्षांचे खासदार विजयी झाले आहेत. ते NDA आघाडीतही नाही आणि इंडिया आघाडीतही नाही. यातील अनेक खासदार हे भाजपचे जुने मित्र आहेत. अशा परिस्थितीत ते एनडीएमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
ही बातमी वाचा :